Liger Twitter Review :  साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) यांचा 'लायगर' (Liger) चित्रपट आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. अभिनेता विजय देवरकोंडा याने या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. पुरी जगन्नाथ (Puri Jagannath) दिग्दर्शित या चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगने तेलुगूमध्ये जबरदस्त कलेक्शन केलेय. पण, हिंदीमध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांनी फारसा प्रतिसाद दिलेला नाही. तर, काही प्रेक्षकांनी या चित्रपटाला नापसंती दर्शवली आहे. ‘लायगर’ चित्रपट पाहिल्यानंतर आता नेटकरी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.


चित्रपटामधील विजयच्या अॅक्शननं आणि अनन्या पांडेच्या (Ananya Panday) ग्लॅमरस अंदाजानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. विजय देवरकोंडा हा ‘लायगर’ या चित्रपटामध्ये फायटरची भूमिका साकारत आहे. ट्रेलरमधील विजयच्या फिटनेसनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. अभिनेत्री अनन्या पांडेनं विजयच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली आहे. तर, राम्या कृष्णन यांनी विजयच्या आईची भूमिका साकारली आहे. मात्र, आता प्रेक्षक या चित्रपटावर नाराजी व्यक्त करत आहेत. तर, ‘एकाही सीनमध्ये मनोरंजन नाही’, असे म्हणत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.


वाचा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया


‘लायगर पाहणे म्हणजे वेळ वाया घालवणे.. खराब कथा, अतिशय कमकुवत पटकथा. मोठ्या कास्टचा काहीही वापर नाही’, ‘चित्रपटाचा सेकेंड हाफ अतिशय खराब असून, पुरी जगन्नाथ पूर्णपणे हरवून गेले आहेत. एकही मनोरंजक सीन नाही. संपूर्ण चित्रपटात विजय देवरकोंडा सुमार वाटला आहे’, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे.






काही चाहत्यांनी केले कौतुक!


या चित्रपटाच्या रिलीजनंतर सोशल मीडियावर हा चित्रपट आवडलेले आणि न आवडलेले असे दोन गट पडले आहेत. काहींना हा चित्रपट आवडलेला नाहीये, तर काहींना मात्र हा चित्रपट आवडलेला आहे. चाहत्यांनी विजय देवरकोंडाचे कौतुक केले आहे. तर, अनन्यालाही कौतुकाची थाप दिली आहे.


‘वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन’ माईक टायसनचा ‘लायगर’ चित्रपटामधील कॅमिओ देखील चर्चेत आला आहे. या चित्रपटासाठी 5 संगीत दिग्दर्शकांनी मिळून, संगीत दिले आहे. ‘लायगर’ चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जन्ननाथ यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती ही करण जोहरनं केली आहे. 'लायगर' हा चित्रपट आज (25 ऑगस्ट) चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. मुंबई, अमेरिका, लास वेगास, हैदराबाद इत्यादी ठिकाणी 'लायगर'  या चित्रपटाचे शूटिंग केले आहे.


हेही वाचा:


Liger Trailer Launch : विजय देवरकोंडाच्या 'लायगर' चित्रपटाचा ट्रेलर लाँच; 'या' बॉलिवूड अभिनेत्याची विशेष उपस्थिती


Akdi Pakdi Song : 'लायगर' सिनेमातील बहुचर्चित 'अकडी पकडी' गाणं रिलीज; विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेचा रोमॅंटिक अंदाज