Jethalal weight loss Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Actor Dilip Joshi Lost 16 Kg In 45 Days : तारक मेहता का उल्टा चष्मा फेम ज्येष्ठ अभिनेते दिलीप जोशी यांना ‘जेठालाल’च्या भूमिकेमुळे मोठी लोकप्रियता मिळाली. मात्र, ते सध्या ते वेगळ्याच गोष्टीत चर्चेत आले आहेत. दिलीप जोशी म्हणजेच सर्वांच्या जेठालालने 45 दिवसांत 16 किलो वजन घटवल्याची चर्चा आहे. त्यांनी याबाबत एका मुलाखीत भाष्य केलंय. 

“मी शूटिंगला जात असे, मग स्विमिंग क्लबमध्ये कपडे बदलून मरीन ड्राइव्हवर धावायला जात असे. (होटेल) ओबेरॉयपर्यंत धावत जायचो आणि पुन्हा परत यायचं. हे सगळं पावसात चालायचं. मी रोज 45 मिनीटे धावायचो. अशा प्रकारे मी दीड महिन्यात 16 किलो वजन कमी केलं,” असं त्यांनी 2023 मध्ये मॅशेबल इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं.

1992 मध्ये आलेल्या गुजराती चित्रपट ‘हूं हुंशी हुंशिलाल’ मध्ये काम करताना त्यांना फिट आणि टोन दिसावं लागणार होतं. त्या आठवणींना उजाळा देताना जोशी म्हणाले, “खूप मजा यायची. सूर्य मावळताना थोडासा पावसाचा शिंतोडा पडायचा. ढग अतिशय सुंदर दिसायचे.”

वजन कमी करण्याबाबत तज्ज्ञ काय सांगतात?

जोशी यांनी जरी याचा आनंद घेतल्याचं कबूल केलं असलं, तरी एका तज्ज्ञाला विचारलं असता त्यांनी या प्रकाराबद्दल सावधगिरी सुचवली. 45 दिवसांत 16 किलो वजन कमी करणे निश्चितच प्रेरणादायी आहे आणि व्यक्तीची शिस्त दर्शवतं. “याचा अर्थ दररोज सुमारे 350 ग्रॅम वजन कमी होणं. ही गती थोडी जास्त वाटू शकते, पण ज्या व्यक्तीचं सुरुवातीचं वजन जास्त आहे, त्यांच्यासाठी हे शक्य होऊ शकतं. कमी कॅलोरी असलेल्या डाएटसोबत दररोज धावणे अशा आक्रमक पद्धतीमुळे सुरुवातीला असे वजन कमी होऊ शकते,” असं इव्हॉल्व फिटनेसचे संस्थापक वरुण रतन यांनी सांगितलं. मात्र, असा प्रकार सर्वांसाठी वापरण्यायोग्य नाही.

“75 किलो वजन असलेली व्यक्ती हाच व्यायाम आणि आहार घेतली, तरी त्यांचे वजन तितक्या वेगाने कमी होणार नाही. आणि जरी झालं तरी त्याचा परिणाम पोषणतटस्थतेवर, स्नायू व हाडांच्या वस्तुमानावर होऊ शकतो,” असं पोषणशास्त्रात तज्ज्ञ असलेल्या रतन यांनी नमूद केलं. “शरीराने दीर्घकाळ अल्प आहार घेतल्यावर आपले एक्स्ट्रा एनर्जी वापरायला लागते. हे ऊर्जेसाठी स्नायूंचे ऊतक वापरू लागतं आणि शरीराची मूलभूत कार्ये चालू ठेवण्यासाठी हाडांमधून कॅल्शियमसारखे आवश्यक पोषकतत्त्व घेतं,” असंही रतन यांनी स्पष्ट केलं.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

The Bombay Journey ft. Dilip Joshi aka Jethalal with Siddhaarth Aalambayan - EP 138 (Part 2)

इतर महत्त्वाच्या बातम्या

लाल दुपट्टेवाली गाण्यामधील 'काले कुर्तेवाली' रातोरात स्टार, पण चेहऱ्यावर अर्धांगवायूचा झटका आला अन्

बॉर्डर सिनेमात सुनील शेट्टीच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री आता कशी दिसते? पाहा भावासोबतचा खास फोटो