A. R. Rahman: चेन्नईमध्ये रविवारी (10 सप्टेंबर) संगीतकार ए आर रहमानच्या (A. R. Rahman) कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. हे कॉन्सर्ट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती. पण आता अनेक नेटकरी ट्विटरवर या कॉन्सर्टच्या खराब व्यवस्थापनामुळे संताप व्यक्त करत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी ट्वीट शेअर करुन तक्रार केली आहे की, कॉन्सर्टमध्ये खराब ऑडिओ सिस्टिम होती. तसेच कॉन्सर्टच्या ठिकाणी झालेल्या गर्दीचा व्हिडीओ देखील अनेकांनी शेअर केला आहे. काही लोकांना या कॉन्सर्टची तिकिटे खरेदी करुनही या कॉन्सर्टमध्ये प्रवेश करता आला नाही. आता या सर्व गोष्टींबाबत ए आर रहमाननं एक ट्वीट शेअर केलं आहे.
ए आर रहमानचं ट्वीट
ए आर रहमाननं ट्वीटमध्ये लिहिलं, 'प्रिय चेन्नई मक्कले, तुमच्यापैकी ज्यांनी तिकिटे खरेदी केली आहेत आणि दुर्दैवी परिस्थितीमुळे जे कॉन्सर्टमध्ये प्रवेश करू शकले नाहीत, कृपया तुमच्या तक्रारींसह arr4chennai@btos.in वर तुमच्या तिकीट खरेदीची एक प्रत शेअर करा. आमची टीम लवकरात लवकर प्रतिसाद देईल.'
चेन्नईच्या ईस्ट कोस्ट रोड येथील आदित्यराम पॅलेस सिटीमध्ये 'माराकुमा नेंजाम' नावाचे कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. एका नेटकऱ्यानं या कॉन्सर्टबाबत ट्वीट शेअर केले होते.या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं, 'खूप वाईट ऑडिओ सिस्टिम होती. कोणतेही गाणे किंवा संगीत ऐकू येत नव्हते. खूप गर्दी, चेंगराचेंगरी झाली. आम्हाला याचा रिफंड पाहिजे'
'भयानक साऊंड सिस्टिम, क्षमतेपेक्षा जास्त तिकिटे विकली गेली होती. सर्व उशिरा येणारे लोक रस्त्यावर बसले होते.' असंही ट्वीट एका नेटकऱ्यानं शेअर केलं आहे.
एका युझरनं ट्वीट केलं,'ए आर रहमान कॉन्सर्टमध्ये चेंगराचेंगरी झाली. कॉन्सर्टमधून अनेकांना परत पाठवले गेले आहे. अनेकांकडे पास असूनही त्यांना आत प्रवेश दिला जात नाव्हता. कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी बऱ्याच वेळ प्रवास करुन आलेल्या लोकांना पार्किंगची देखील मोठी समस्या होती.'
इतर महत्वाच्या बातम्या: