Border Fame Actress Sharbani Mukherjee : बॉलिवूडमध्ये फक्त लोकांचे मनोरंजन करणारे सिनेमेच नाही तर आपल्या भारतीय सैनिकांचं शौर्य दाखवणारे सिनेमे देखील आपल्याला पाहायला मिळतात. अशा अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं आहे, पण "बॉर्डर" हा चित्रपट त्यापैकी एक आगळंवेगळं स्थान राखून आहे. तो केवळ एक युद्धपट नाही, तर प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत पेटवणारा चित्रपट आहे. 1971 साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेला "बॉर्डर" चित्रपट 13 जून 1997 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखन सुप्रसिद्ध दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांनी केलं आहे. त्यांनी आपल्या वडिलांच्या आठवणी, प्रेरणेतून आणि भारतीय सैन्याच्या शौर्यावर विश्वास ठेवून या चित्रपटाची निर्मिती केली.
या चित्रपटात सनी देओल, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, जॅकी श्रॉफ, कुलभूषण खरबंदा यांसारख्या कलाकारांनी आपापल्या भूमिकेत जीव ओतला आहे. विशेषतः सनी देओल यांनी साकारलेला मेजर कुलदीप सिंग चांदपुरी हा देशभक्त आणि प्रेरणादायक सेनानी, प्रेक्षकांच्या मनात आजही कोरलेला आहे. राजस्थानमधील लोंगेवालाच्या सीमापोस्टवर घडलेली ही सत्यकथा, भारतीय सैन्याच्या शौर्याची साक्ष देणारी आहे.
दरम्यान, या सिनेमात सुनील शेट्टीच्या रुपात एका भारतीय सैनिकाचं वैवाहिक आयुष्य दाखवण्यात आलंय. बॉर्डरमध्ये शभांगी मुखर्जी हिने सुनील शेट्टीची पत्नी म्हणून विशेष भूमिका साकारली आहे. सुनील शेट्टी आणि शुभांगी मुखर्जीचं To Chalun हे गाणं आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. दरम्यान, शुभांगी मुखर्जी सध्या इन्स्टाग्रामव सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. तिने इन्स्टाग्रामवर बरेच फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री आपल्या भावासोबत पाहायला मिळत आहे. शुभांगीने तिच्या भावाचं वर्णन आधारस्तंभ म्हणून केलं आहे.
बॉर्डर सिनेमात युद्धाच्या साहसी प्रसंगांबरोबरच सैनिकांचे भावविश्वही तेवढ्याच संवेदनशीलतेने मांडले आहे. युद्धात सहभागी होणाऱ्या जवानांचा घरातील भावनिक संघर्ष, त्यांच्या आयुष्यातील स्त्रियांचे दुःख, आणि प्रत्येक क्षणी मृत्यूशी लढताना मनात असलेली आई, बायको, भाऊ, मुलं – हे सगळं चित्रपटात फार प्रभावीपणे दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे प्रेक्षक केवळ युद्ध पाहत नाहीत, तर तो युद्धात उतरलेल्या प्रत्येक सैनिकाच्या अंतर्मनाचा अनुभव घेतात.
‘बॉर्डर’मधील गाणी ही चित्रपटाची एक विशेष ताकद आहेत. अनु मलिक यांचं संगीत आणि जावेद अख्तर यांचे विचारप्रवण गीत, विशेषतः “संदेशे आते हैं”, आजही ऐकताना अंगावर शहारा येतो आणि डोळे पाणावतात. या गाण्याने लाखो लोकांच्या मनात देशप्रेम जागं केलं. या चित्रपटात वापरलेली प्रत्येक धून, प्रत्येक ओळ, तीव्र भावनिक परिणाम करून जाते.
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यशस्वी ठरला. त्याला अनेक राष्ट्रीय आणि फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. पण या यशापेक्षा मोठं यश म्हणजे त्याने सामान्य जनतेच्या मनात भारतीय सैन्याबद्दल निर्माण केलेला आदर आणि आत्मीयता. 'बॉर्डर' पाहिल्यानंतर प्रत्येकजण एक क्षणभर सैनिकाच्या जागी स्वतःला पाहतो, त्यांचा अभिमान बाळगतो आणि देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा घेतो. आजही हा चित्रपट टीव्हीवर लागला की घरातील सर्वजण टीव्हीसमोर निःशब्द होऊन बसतात. युद्धाचे आवाज, सैनिकांचे हुंकार, आणि गाण्यांमधून वाहणारे भाव – हे सगळं घराघरांत अनुभवलं जातं.
इतर महत्त्वाच्या बातम्या
लाल दुपट्टेवाली गाण्यामधील 'काले कुर्तेवाली' रातोरात स्टार, पण चेहऱ्यावर अर्धांगवायूचा झटका आला अन्
