Lahore 1947 Movie : बॉलिवूड स्टार सनी देओलच्या आगामी लाहोर 1947  (Lahore 1947 Movie) चित्रपटाला घेऊन सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत. अनेक हिट चित्रपट देणारी दिग्दर्शक राजकुमार संतोषी (Rajkumari Santoshi) आणि सनी देओल  (Sunny Deol) ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे. आता या चित्रपटातील खलनायकाचे नाव समोर आले आहे. 


'लाहोर 1947' मध्ये या खलनायकाची एन्ट्री 


चित्रपटात खलनायकाची भूमिका अभिनेता अभिमन्यू सिंह करणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी म्हणाले, “सामान्यत: जेव्हाही आपण खलनायकाच्या व्यक्तिरेखेचा विचार करतो तेव्हा आपल्या मनात सर्वप्रथम अमरीश पुरी आणि डॅनी यांची नावे येतात.पण, आता यापुढे ही खलनायकी भूमिका कोण साकारू शकतात, हे पाहायलं हवे असे त्यांनी म्हटले.ॉ


अभिमन्यू सिंह हा लाहोर 1947 मध्ये एक जबरदस्त खलनायकी भूमिका साकारेल असा विश्वास राजकुमार संतोषी यांनी व्यक्त केला. त्याचा आवाज, दृढ विश्वास कमालीचा आहे. तो नक्कीच आपल्या इंडस्ट्रीतील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक असल्याचे संतोषी यांनी म्हटले. 


कोणत्या चित्रपटात काम केलंय?


अभिमन्यू सिंहने हिंदीसह तेलगू आणि तामिळ चित्रपटात काम केले आहे. आपल्या दमदार भूमिकांनी अभिमन्यूने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. लक्ष्य, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा, राम लीला सारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटात त्याने भूमिका साकारल्या आहेत.


आमिर खानची निर्मिती


लाहोर 1947 हा चित्रपट आमिर खान आपल्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनर अंतर्गत करत आहेत. या चित्रपटात सनी देओल आणि प्रीती झिंटा यांची जोडी झळकणार आहे. बऱ्याच कालावधी नंतर प्रीती झिंटा ही रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण 12 जानेवारी पासून सुरू करण्यात आले आहे. 


'लाहौर 1947'मध्ये शबाना आझमीदेखील (Shabana Azmi) झळकणार आहेत. शबाना आझमी या सिनेमात एका हिंदू महिलेच्या भूमिकेत झळकणार आहेत. अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 'लाहौर 1947' या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.


राजकुमार संतोषी आणि सनी देओल यांनी 'घायल', 'दामिनी' आणि 'घातक'  यांसारख्या चित्रपटांसाठी एकत्र काम केलं आहे. आता सनी देओल आणि  राजकुमार संतोषी यांचा लाहोर-1947 हा चित्रपट रिलीज होणार आहे.


 इतर महत्त्वाच्या बातम्या :