Kavita Chaudhary Died : 'उडान' फेम अभिनेत्री कविता चौधरी (Kavita Chaudhary) यांचे वयाच्या 67 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दूरदर्शनच्या 'उडान' या लोकप्रिय मालिकेत आयपीएस अधिकारी कल्याणी सिंह यांची भूमिका साकारून कविता यांनी ने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. कविता यांच्या निधनाच्या बातमीमुळे त्यांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसलाय. तसेच सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.


नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये कविता यांचा मित्र अभिनेता अनंगा देसाई यांनी एबीपी न्यूजला माहिती देताना कविता चौधरी यांच्या मृत्यूविषयी माहिती दिली. कविता चौधरी यांचे पुतणे अजय सायल यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, गेल्या तीन-चार दिवसांपासून कविता चौधरी यांच्यावर अमृतसरमधील पार्वतीदेवी रुग्णालयात उपचार सुरु होते. काल रात्री म्हणजे रात्री 8.30 वाजता  त्यांनी अमृतसरमधील याच रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.


अमृतसरमध्ये होणार अंत्यसंस्कार


कविता चौधरी गेल्या काही वर्षांपासून कॅन्सरने त्रस्त होत्या आणि अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.कविता चौधरी यांचा पुतण्या अजय सायल यानेही यावेळी माहिती दिली की, कविता चौधरी यांच्यावर अमृतसरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. 


'उडान' मालिकेने दिली होती ओळख


1989 मध्ये प्रसारित झालेल्या उडान या कार्यक्रमामध्ये कविता यांनी आयपीएस अधिकारी कल्याणी सिंह यांची भूमिका साकारली होती. या कार्यक्रमाचे लेखन  आणि दिग्दर्शनही त्यांनीच केले होते. हा कार्यक्रम त्यांची बहिण कांचन चौधरी भट्टाचार्य यांच्या जीवनावर आधारित होता. ज्या किरण बेदी यांच्यानंतर दुसऱ्या आयपीएस अधिकारी होत्या. चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये महिला आयपीएस अधिकाऱ्यांचे फारसे प्रतिनिधित्व नसल्यामुळे कविता यांचा उडान हा कार्यक्रम महिला सक्षमीकरणाचे उदाहरण बनला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये 'युअर ऑनर' आणि 'आयपीएस डायरीज' सारख्या कार्यक्रमांची देखील निर्मिती देखील केली. 


1980 आणि 1990 च्या दशकात प्रसिद्ध सर्फ जाहिरातींमध्ये ललिताची भूमिका साकारण्यासाठीही कविता यांना ओळखले जाते. या जाहिरातींमध्ये त्यांना एका गृहिणीची भूमिका साकारली होती. त्यांच्या या पात्राविषयी बोलताना कविता यांनी  द क्विंटला सांगितले की,ललिता जी एक नॉनसेन्स कॅरेक्टर होती, माझं व्यक्तिमत्व तसं अजिबात नाही.परंतु त्यांना असे वाटले की मी कदाचित त्याचा टोन समजू शकते.  


ही बातमी वाचा : 


Kailash Waghmare : ज्याचे तु्म्ही फॅन असता, तीच व्यक्ती फोटोसाठी आग्रह करते, तेव्हा...; मराठी अभिनेत्यानं सांगितला खास अनुभव