Lagnakallol : 'लग्नकल्लोळ' (Lagnakallol) या मराठी सिनेमाची काही दिवसांपूर्वी घोषणा झाली होती. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थ जाधवच्या (Siddharth Jadhav) आगामी 'लग्नकल्लोळ' या सिनेमाचा टीझर आता आऊट झाला आहे. 


'लग्नकल्लोळचा धमाकेदार टिझर प्रदर्शित (Lagnakallol Teaser Out)


मयुरी देशमुख (Mayuri Deshmukh), सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) आणि भूषण प्रधान (Bhushan Pradhan) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'लग्नकल्लोळ' या चित्रपटाचा जबरदस्त टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. टिझर पाहून प्रेक्षक या धमाकेदार चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 


टिझरमध्ये सिद्धार्थ सोबत मयुरी लग्नमंडपात दिसत आहे तर दुसऱ्या क्षणी भूषण मयुरीला लग्नाची मागणी घालताना दिसत आहे. यावरून मयुरी नक्की कोणासोबत लग्न करणार आणि हा काय ‘लग्नकल्लोळ’ सुरू आहे, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहे. चित्रपटात या प्रमुख कलाकारांसोबत अनेक दमदार कलाकार आहेत. हा लग्नाचा धमाका 1 मार्चला उडणार आहे.






मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे, आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शित 'लग्न कल्लोळ' या चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केले आहे. 


'लग्नकल्लोळ' चित्रपटाबद्दल दिग्दर्शक, मोहम्मद बर्मावाला म्हणतात,"चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. लग्न म्हटले की घरात  कल्लोळ हा आलाच. परंतु हा कल्लोळ जरा वेगळा आहे. यात ट्विस्ट आहे. हा कौटुंबिक चित्रपट असून प्रेक्षकांसाठी निखळ मनोरंजनाचा खजिना आहे". 


'लग्न कल्लोळ' कधी रिलीज होणार?


'लग्न कल्लोळ' सिनेमाच्या नवीन पोस्टरसोबत  रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. 'लग्न कल्लोळ' हा सिनेमा 1 मार्च 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केले आहे. 


'लग्न कल्लोळ' या चित्रपटाच्या नावावरून आणि मोशन पोस्टरवरून हा चित्रपट 'लग्न' या विषयावर भाष्य करणारा चित्रपट आहे, हे दिसतेय. मात्र आता यात 'कल्लोळ' काय पहायाला मिळणार, याचे उत्तर मात्र चित्रपटच देऊ शकेल. दरम्यान या चित्रपटाचे पोस्टर अतिशय कलरफुल आणि प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारे आहे.


संबंधित बातम्या


Lagnakallol : सनई चौघडे वाजणार, लग्न पंचक्रोशीत गाजणार; सिद्धार्थ जाधव, मयुरी देशमुख आणि भूषण प्रधानचा 'लग्नकल्लोळ'! फर्स्ट लूक आऊट