Rohit Pawar: फिल्मफेअर पुरस्कार सोहळा (Filmfare Awards 2024) हा गुजरातमध्ये पार पडला. अनेक सेलिब्रिटींनी या सोहळ्याला हजेरी लावली. काही नेत्यांनी यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याबाबत एक ट्वीट शेअर करुन टीका केली होती, अशातच आता रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देखील ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी सरकारवर टीका केली आहे.
रोहित पवार यांचे ट्वीट
रोहित पवार यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, "मुंबईतले उद्योग, IFSC सेंटर, हिरे व्यापार यानंतर आता मुंबईतल्या चित्रपट उद्योगावर महाराष्ट्रविरोधी शक्तींचा डोळा आहे. चित्रपट सृष्टीचे निर्माते दादासाहेब फाळके यांच्या योगदानाने उभ्या राहिलेल्या चित्रपट नगरीचे महत्व कमी करण्यासाठी आधी filmfare पुरस्कार सोहळा गुजरातला गेला आता उत्तर प्रदेशात फिल्मनगरी उभारण्याच्या हालचाली सुरु आहेत."
पुढे त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, "असे असताना आपले गोलमाल सरकार मात्र खुर्ची टिकवण्यासाठी कुठलाही विरोध न करता केवळ बघ्याची भूमिका घेत आहे, परंतु कोणी कितीही ताकद लावली आणि या बाह्य शक्तींना आपल्याच गद्दारांनी कितीही मदत केली तरी मुंबईचं हे वैभव कुणालाही हिसकावून नेता येणार नाही. शेवटी IFSC सेंटर, डायमंड बोर्स बाबतीत जे झालं तेच होईल कारण मुंबई ही मुंबई आहे. महाराष्ट्राचा प्राण आहे!"
'फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024' चे विजेते
गुजरातमधील गांधीनगरमध्ये 'फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024' पुरस्कार सोहळा पार पडला. यंदा आलिया भट्टला 'फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023'मध्ये 'गंगूबाई काठियावाडी'या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला. तर रणबीर कपूरला अॅनिमल या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तसेच 12 वीं फेल या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: