Pushkar Jog : अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) सध्या त्याच्या आगामी सिनेमासह वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वेक्षण करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या (BMC) कर्मचाऱ्यांबद्दल त्याने एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. अखेर आता अभिनेत्याने बीएमसी कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मराठा आरक्षणासंदर्भात सर्वेक्षण करण्यासाठी बीएमसी कर्माचारी पुष्करच्या घरी गेली होती. त्यावेळी महिला कर्मचारीने जात विचारलेली पुष्करला आवडलं नाही. त्यानंतर बाईमाणूस नसत्या तर दोन लाथा नक्कीच मारल्या असत्या, असं वक्तव्या त्याने केलं. त्यानंतर खूप गदारोळ माजला. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी संताप व्यक्त केला.
पुष्कर जोगने BMC कर्मचाऱ्यांची मागितली माफी
अभिनेता पुष्कर जोगने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत BMC कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे. त्याने लिहिलं आहे,"मी रविवारी एक पोस्ट केली होती. ज्या पोस्टचा हेतू हा फक्त आणि फक्त हेच सांगण्याचा होता की, मी केवळ माणूसकी हाच धर्म मानतो. अर्थात व्यक्त होताना बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल जे विधान माझ्याकडून गेलं त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण ते कर्मचारी त्यांना दिलेलं काम करत होते. वैयक्तिक बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल माझ्या मनात आदराचीच भावना आहे. माझ्या विधानामुळे ते दुखावले गेले असतील तर पुन्हा एकदा दिलगिरी".
पुष्करची आधीची पोस्ट काय होती? (Pushkar Jog Post)
पुष्करने लिहिलं होतं,"काल बीएमसीच्या काही कर्मचारी माझ्या घरी आल्या आणि मला सर्व्हे करतोय म्हणून माझी जात विचारत होते. ते जर बाई माणूस नसते तर दोन लाथा नक्कीच मारल्या असत्या. कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका. नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारणार".
पुष्करचा 'मुसाफिरा' प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज!
पुष्कर जोग सध्या त्याच्या आगामी 'मुसाफिरा' या सिनेमामुळे चर्चेत आहे. येत्या 2 फेब्रुवारी 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात पुष्करसह पूजा सावंत, पुष्कराज चिरपुटकर, स्मृती सिन्हा, दिशा परदेशी हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. पुष्कर जोग हा मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचे बापमाणूस, जबरदस्त, तुक्या तुकविला, नाग्या नाचविला, मिशन पॉसिबल हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.
संबंधित बातम्या