मुंबई : 'लाल रंग' या रणदीप हुडाच्या आगामी चित्रपटातील पहिलं गाणं रिलिज झालं आहे. 'तेरे पे करदू खर्च करोड' हे पंजाबी धाटणीचं रॅप साँग यूट्यूबवर धुमाकूळ घालत आहे.


 
या गाण्याच्या व्हिडिओमध्ये अभिनेता रणदीप हुडासोबत गायक-रॅपर फझीलपुरिया दिसत आहे. विपीन पटवाने संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला पंजाबी लहेजा आहे. विकास आणि विपीन पटवा यांनी हे गाणं गायलं आहे.

 
अभिनेता रणदीप हुडा एका वेगळ्याच रुपात पाहायला मिळणार आहे. कपूर अँड सन्स चित्रपटातल्या कर गयी चुल गाण्यानंतर फझीलपुरिया पुन्हा सर्वांना थिरकवण्यास सज्ज आहे.

 
एकीकडे सरबजीत चित्रपटाच्या टीझरमध्ये रणदीप हुडा एका वेगळ्या भूमिकेत दिसत असताना, त्याचं हे फंकी आणि कूल रुप चाहत्यांना आनंददायी ठरेल.

 

पाहा व्हिडिओ :