मुझे तुमसे अकेले में बात करनी हैं, कतरिनाची रिक्वेस्ट रणबीरने धुडकावली
एबीपी माझा वेब टीम | 16 Apr 2016 06:30 AM (IST)
मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि कतरिना कैफचं ब्रॆकअप होऊन जवळपास तीन महिने उलटले आहेत. मात्र कतरिनाला हे ब्रेकअप चांगलंच जिव्हारी लागल्याचं दिसतंय. कतरिना रणबीरला विसरू शकत नाही. एवढंच नाही तर कतरिनाने रणबीरसोबत पॅचअप करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र म्हणतात ना "ए इश्क नही है आसान, यहाँ कम लोगो को मिलता है सच्चा प्यार" अशी काही हालत कतरीनाची झाली आहे. नुकतंच एका बॉलिवूड सेलिब्रिटीच्या पार्टीत रणबीर - कतरिना एकमेकांना टाळताना दिसले. मात्र न राहावल्याने स्वत: कतरिनाच रणबीरकडे गेली आणि "मुझे तुमसे अकेले में बात करनी हैं" असं म्हणाली. मात्र ब्रेकअपमुळे बोलण्याच्या मनस्थितीत नसलेल्या रणबीरने तिला थेट नकार दिला. रणबीर म्हणाला, " तुला जे काही बोलायचं आहे, ते सर्वांसमोर बोल. माझ्याकडून सर्व काही संपलं आहे, तू सुद्धा या नात्याला विसरून पुढे जा". रणबीरच्या या वक्तव्यामुळे कतरिनावर अक्षरश: दु:खाचा डोंगर कोसळला. काही दिवसांपूर्वीच कपूर फॅमिलीने कतरिनाला त्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधूनही काढून टाकण्यात आलं होतं. या सर्व प्रकारामुळे तूर्तास तरी रणबीर - कतरिना प्रत्यक्षात एकत्र येणार नाहीत हेच दिसतंय. पण रिल लाईफमध्ये 'जग्गा जासूस' या सिनेमात हे दोघेही एकत्र पाहायला मिळतील.