Kushal Badrike : प्रविण तरडेंचा (Pravin Tarde) 'सरसेनापती हंबीरराव'(Sarsenapati Hambirrao) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  'परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट' असे दमदार डायलॉग या सिनेमात आहेत. अनेक कलाकार देखील हा चित्रपट आवर्जून बघत असून, त्यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.


‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) यानेदेखील सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा पाहिला आहे. सिनेमा पाहिल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे. कुशलची लक्षवेधी पोस्ट वाचून, त्याला हा सिनेमा खूपच आवडल्याचे लक्षात येत आहे. 


प्रविण विठ्ठल तरडे यांची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असलेला ‘सरसेनापती हंबीरराव’ हा सिनेमा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. सिनेमा पाहिल्यानंतर विनोदवीर कुशलने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. त्याने लिहिली आहे, 'हंबीरराव' एक दैदीप्यमान सिनेमा. एखादं ऐतिहासिक पुस्तक वाचताना, आपल्या डोळ्यांसमोर काही चित्र उभी रहातात, काही प्रसंग तर चक्क दिसू लागतात, पण 'हंबीरराव' हा सिनेमा आपल्याला इतिहासात घेऊन जातो. आपण आपलं अस्तित्व विसरून इतिहास जगू लागतो, त्या लढायांमध्ये एखादी तलवार हाती घेऊन आपणही 'स्वराज्याच्या पायरीला' शत्रूच्या रक्ताने आणि आपल्या प्राणाने अभिषेक घालावा असं वाटत राहतं.






कुशलने प्रवीण तरडेचे आभार मानत पुढे लिहिले आहे,"प्रवीण तरडे या सिनेमासाठी मी तुझा आणि तुझ्या निर्मात्यांचा कायम ऋणी राहीन. इतिहास आपल्याला जगायला शिकवतो. आपल्या मुलांना जर कसं जगायचं? हे शिकवायचं असेल तर त्यांना 'सरसेनापती हंबीरराव' हा सिनेमा नक्की दाखवा. 


कुशलचा आगामी सिनेमा


'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या माध्यमातून कुशल घराघरांत पोहोचला. कुशलचा पांडू सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का अशी कुशलची ओळख आहे. कुशलचा भिरकीट हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. 


संबंधित बातम्या


Sarsenapati Hambirrao Review : सर(स) सेनापती!


Pravin Tarde : फक्त 50 दिवस राहिले म्हणत प्रविण तरडेंनी शेअर केले 'सरसेनापती हंबीरराव'चे पोस्टर