Asha Sharma Death: टीव्ही इंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. अनेक कार्यक्रम आणि चित्रपटांमध्ये काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा शर्मा (Asha Sharma) यांचं निधन झालं आहे. आशा शर्मा यांनी वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन (CINTAA) ने अभिनेत्रीच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहणारी पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. आशा शर्मा यांच्या निधनामुळे टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. आशा शर्मा यांनी  'कुमकुम भाग्य' सारख्या मालिका आणि आदिपुरुष यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.                                                          


तरीही त्यांच्यामध्ये काम करण्याचा उत्साह - टीना घई


आशा शर्मा एक वर्षाहून अधिक काळ अंथरुणाला खिळल्या होत्या. अभिनेत्री टीना घईने बोलताना सांगितले की, 'गेल्या वर्षी तिचा आदिपुरुष चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्या 4 वेळा घसरुन पडल्या होत्या. एप्रिल महिन्यांपासून ते पूर्णपणे अंथरुणाला खिळून होत्या. आशा शर्मा यांना शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचे होते. पण तरीही त्यांच्यामध्ये काम करण्याचा उत्साह होता. 


अत्यंत दुर्दैवी - ओम राऊत


ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष या सिनेमा आशा शर्मा यांनी माता शबरीची भूमिका साकारली होती. त्यांच्या निधनानंतर ओम राऊतने भावना व्यक्त करता म्हटलं की, 'हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्या खूप छान अभिनेत्री आणि व्यक्ती होत्या. ही बातमी ऐकून खूप वाईट वाटतंय.'


धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यासोबतही केलंय काम


'नुक्कड' आणि 'बुनियाद' सारख्या मालिकांशिवाय आशा यांनी 'महाभारत' (1997) आणि 'कुमकुम भाग्य' या मालिकांमधूनही लोकप्रियता मिळवली. 'हम तुम्हारे हैं सनम', 'मुझे कुछ कहना है', 'हमको तुमसे प्यार है' आणि '1920' सारख्या चित्रपटांमध्येही त्या दिसल्या होत्या. त्यांनी धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यासोबत 'दो दिशां' या चित्रपटातही काम केले होते.






ही बातमी वाचा : 


Aishwarya Narkar : 'दहा पोरांची अशक्त आई...', ट्रोल करणाऱ्याला ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, 'आपली लायकी काय...'