Kangana Ranaut On Not Attending Anant Ambani Wedding: उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीने (Anant Ambani) 12 जुलै रोजी राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) लग्नगाठ बांधली. या सोहळ्याला जगभरातील मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे जवळपास संपूर्ण बॉलीवूडने या सोहळ्याला हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. पण कंगना रणौत मात्र या सोहळ्याला उपस्थित नव्हती. त्याच कारणही कंगनाने (Kangana Ranaut) नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. 


सिद्धार्थ काननला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगना राणौतने याबाबत खुलासा केला आहे. तसेच अनंत अंबानीने स्वत: तिला फोन करुन आमंत्रण दिल्याचंही कंगनाने सांगितलं. अनंतच्या लग्नात अनेक बॉलीवूड कलाकार गैरहजर दिसले होते. पण त्यांच्या गैरहजेरीचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही. आता कंगनाने मात्र तिच्या अनुपस्थितीचं कारण स्पष्ट केलंय. 


'तरीही मी फिल्मी लग्नसोहळ्यांना जाण्याचे टाळते...'


कंगना रणौतने म्हटलं की, 'मला अनंत अंबानींचा फोन आला आणि तो खूप गोड मुलगा आहे. त्याने मला त्याच्या लग्नाला यायला सांगितले. पण त्याचदिवशी माझ्याही घरी लग्न होतं. तो दिवस खूप शुभ दिवस होता आणि माझ्या धाकट्या भावाचे लग्न होते. पण तरीही मी फिल्मी लग्नसोहळ्यांना जाणं टाळतो.


कोणत्याही कार्यक्रमात कंगना नव्हती


अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी मार्चमध्ये गुजरातमधील जामनगरमध्ये त्यांचं पहिलं प्री-वेडिंग फंक्शन केलं होतं. यानंतर त्यांचा दुसरा प्री-वेडिंग फंक्शन 29 मे ते 2 जून दरम्यान क्रूझवर झालं. ग्नाआधीच्या दोन ग्रँड बॅशनंतर अनंत-राधिकाचा 12 जुलैला मुंबईत लग्नसोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला जगभरातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अनंत अंबानींच्या लग्नाला सलमान खान, ऐश्वर्या राय, अमिताभ बच्चन, प्रियांका चोप्रा आणि हृतिक रोशन यांसारखे बॉलिवूड स्टार्स उपस्थित होते. मात्र, कंगना राणौतने कोणत्याही कार्यक्रमाला हजेरी लावली नाही.


6 सप्टेंबर रोजी इर्मजन्सी होणार रिलीज


दरम्यान कंगना सध्या तिच्या आगामी इमर्जन्सी' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तिचा हा सिनेमा येत्या 6 सप्टेंबर रोजी रिलीज करण्यात येणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता श्रेयस तळपदे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या या सिनेमाची अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे. 


ही बातमी वाचा : 


वेदा, स्त्री-2 की खेल खेल में, बॉक्स ऑफिसवर कोण ठरलं सरस? जाणून घ्या कोणी किती कमवले?