एक्स्प्लोर

कुलकर्णी चौकातला देशपांडे.. ब्राह्मणी आडनावांबाबात काय म्हणाले गजेंद्र आहिरे

दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांचा कुलकर्णी चौकातला देशपांडे हा मराठी चित्रपट प्रदर्शनाआधीच वादात सापडला आहे. यात चित्रपटातील नावावर ब्राह्मण समाजाने आक्षेप घेतला असून चित्रपट चालू देणार नसल्याचे पत्र दिले आहे. यावर दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : या शुक्रवारी गजेंद्र अहिरे दिग्दर्शित कुलकर्णी चौकातला देशपांडे हा एक मराठी चित्रपट प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटात सई ताम्हणकर, निखिल रत्नपारखी, स्पृहा जोशी आदींच्या भूमिका आहेत. चित्रपटाचा ट्रेलर आणि जाहिराती पाहता हा चित्रपट एका धाडसी आणि आपल्या मतांवर ठाम असणाऱ्या गृहिणीवर बेतला असल्याचं कळतं. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच चित्रपटाच्या नावावरुन वाद सुरु झाले आहेत. या नावात कुलकर्णी आणि देशपांडे अशी दोन विशिष्ट समाजातील नावं असल्यामुळे याला ब्राह्मण समाजाने आक्षेप घेतला. चित्रपट चालू न देण्याबद्दल पत्रं दिली गेली. या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन गजेंद्र आहिरे यांचे आहे. या वादावर दिग्दर्शक शांत होते. मात्र, एबीपी माझाला मुलाखत देताना त्याची सुरुवातच या प्रश्नाने झाल्यानंतर त्यांनी यावर आपली बाजू मांडली. ब्राह्मण संघाने या चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेतल्यानंतर या सिनेमाबद्दल बरीच चर्चा झडली. मात्र, आपल्या मतावर दिग्दर्शक ठाम आहे. या मुद्द्याला धरुन बोलताना दिग्दर्शक आहिरे म्हणाले, 'या चित्रपटात आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही. हे सिनेमा पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल. उरला प्रश्न आडनावांचा तर विशिष्ट समाजाची जगण्याची, जीवनपद्धतीची आपली अशी पद्धत असते. त्यांच्या जेवणापासून कपडे परिधान करण्यापर्यंत त्या जगण्याचं प्रतिबिंब त्यावर असतं. माझ्या चित्रपटातील व्यक्तिरेखा ब्राह्मण आहे. याचं कारण त्या गोष्टीत आहे. पण यातली गृहिणी बोल्ड असली तरी या चित्रपटात हिडीस, बिभत्स असं काही नाही. उलट स्त्रीयांबद्दलचे अनेक महत्वाचे मुद्दे यात मांडले गेले आहेत. ' दिग्दर्शकाने आपलं म्हणणं मांडलं असलं तरी या संघटनांनी चित्रपट पाहण्यात रस दाखवला होता. त्यांना हा सिनेमा दाखवला का यावर दिग्दर्शक म्हणाले, 'सिनेमा हा व्यवसायाचा भाग आहे. सिनेमा प्रदर्शित होताना त्याला अडचणी आलेल्या कुणाला हव्या असतात? विनाकारण वाद वाढतो हे लक्षात आल्यानंतर आमच्या निर्मात्यांनी हा सिनेमा ब्राह्मण संघटनांच्या प्रतिनिधींना दाखवला. त्यात काही महिला व काही पुरूष होते. त्यांनी सिनेमा पाहिल्यावर काहीच आक्षेप घेतला नाही.' इतरत्रही काही शहरांत हा चित्रपट बॅन करण्याबाबत बोललं जातं आहे. त्यालाही उत्तर देताना दिग्दर्शक आहिरे म्हणाले, त्यांनाही मी हेच सांगेन की त्यांनी आधी सिनेमा बघावा आणि त्यानंतर आपली भूमिका घ्यावी. 17 वर्षात 53 चित्रपट कुलकर्णी चौकातला देशपांडे हा गजेंद्र आहिरे यांचा प्रदर्शित होणारा 53 वा चित्रपट आहे. अवघ्या 17 वर्षात त्यांनी ही मजल मारली आहे. याबद्दल ते म्हणाले, हा माझा 53 वा चित्रपट आहे. अवघ्या 17 वर्षात मी हा टप्पा गाठला आहे. मी केलेल्या अभ्यासात अवघ्या 17 वर्षात 53 चित्रपट केलेला आणि कुणीही पाहिलेला नाही. खरंतर लोक मला हसतात. पण चित्रपट बनवणे हे माझं काम आहे मी ते करतो." विशेष बाब अशी की या 53 चित्रपटांच्या कथाही गजेंद्र यांच्याच आहेत. Copy Marathi Movie | 'कॉपी' मराठी सिनेमा नेमका आहे तरी काय? | ढॅण्टॅढॅण | ABP Majha संबंधित बातम्या : 

#MeToo आरोपांमुळे अनु मलिकची 'इंडियन आयडॉल'मधून पुन्हा हकालपट्टी

अजय देवगण निर्मित 'तानाजी' वादाच्या भोवऱ्यात; राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाडांचं धमकीवजा ट्वीट

महत्त्वाच्या बातम्या

Palash Muchhal Singer Sangli: गायक पलाश मुछलच्या अडचणीत वाढ; सांगलीत ॲट्रॉसिटीचा गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
गायक पलाश मुछलच्या अडचणीत वाढ; सांगलीत ॲट्रॉसिटीचा गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
Ashok Saraf Emotional Father Death: शूटिंग सुरू असतानाच अशोक सराफ यांच्या वडिलांचं निधन; प्रसिद्ध कॅमेरामनने सांगितला कॅमेऱ्यामागचा प्रसंग
शूटिंग सुरू असतानाच अशोक सराफ यांच्या वडिलांचं निधन; प्रसिद्ध कॅमेरामनने सांगितला कॅमेऱ्यामागचा प्रसंग
Aarti Solanki on Balancing Devi Murti: '...स्वत:च्या घरच्यांना हवेत लटकवा'; गणपती बाप्पांच्या मूर्तीनंतर देवींच्या बॅलेन्सिंग मूर्ती पाहून मराठी अभिनेत्री भडकली, पोस्टवर संताप व्यक्त
'...स्वत:च्या घरच्यांना हवेत लटकवा'; गणपती बाप्पांच्या मूर्तीनंतर देवींच्या बॅलेन्सिंग मूर्ती पाहून मराठी अभिनेत्री भडकली, पोस्टवर संताप व्यक्त
Janhavi Killekar Pune Missing Boy: कॉपी करताना पकडलं, शिक्षकांनी झापलं, घाबरुन विद्यार्थी घरीच गेला नाही, 26 दिवसांपासून बेपत्ता; अभिनेत्री जान्हवी किल्लेकर म्हणाली...
कॉपी करताना पकडलं, शिक्षकांनी झापलं, घाबरुन विद्यार्थी घरीच गेला नाही, 26 दिवसांपासून बेपत्ता; अभिनेत्री जान्हवी किल्लेकर म्हणाली...

व्हिडीओ

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक आजपासून सुरु, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
Embed widget