एक्स्प्लोर
Advertisement
...तर मी आत्महत्या करेन : कमाल आर खान
याआधी मागील वर्षी प्रदर्शित झालेला अजय देवगणच्या 'शिवाय' चित्रपटाच्या वाईट रिव्ह्यूमुळे त्याचं अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं होतं.
मुंबई : "15 दिवसात माझं ट्विटर अकाऊंट सुरु केलं नाही तर मी आत्महत्या करेन," अशी धमकी अभिनेता कमाल आर खानने दिली आहे. केआरकेने प्रेस रिलीज जारी करुन आत्महत्येची धमकी दिली आहे.
बॉलिवूड अभिनेता आमीर खानवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी ट्विटरने केआरकेचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड केलं होतं. यानंतर ट्विटरविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचंही म्हटलं होतं.
याआधी मागील वर्षी प्रदर्शित झालेला अजय देवगणच्या 'शिवाय' चित्रपटाच्या वाईट रिव्ह्यूमुळे त्याचं अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं होतं.
आता केआरकेने प्रेस रिलीज जारी करत आपलं अकाऊंट पुन्हा अॅक्टिव्ह करण्याची विनंती ट्विटरला केली आहे. "जर अकाऊंट रिस्टोअर झालं नाही तर आत्महत्या करेन," अशी धमकी त्याने दिली आहे.
केआरकेने प्रेस रिलीज जारी करुन म्हटलं आहे की, "@Twitterindia आणि त्यांचा स्टाफ महिमा कौल, विरल जैन आणि तरनजीत सिंह यांना माझी विनंती आहे की, 15 दिवसात माझं अकाऊंट पुन्हा सुरु करावं. सुरुवातीला त्यांनी माझ्याकडून लाखो रुपये घेतले आणि अचानक माझं अकाऊंट सस्पेंड केलं. ट्विटरने माझी फसवणूक केली आहे, त्यामुळे मी दु:खी आहे. जर माझं अकाऊंट रिस्टोअर झालं नाही तर मी आत्महत्या करेन. हेच लोक माझ्या मृत्यूसाठी जबाबदार असतील."
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion