Kranti Redkar : मुंबईतील एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. क्रांती रेडकर यांनी सांगितले की,"काही दिवसांपूर्वी तिघांनी आमच्या घराची रेकी केली. घराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हे लक्षात येईल". आपलं कुटुंब सुरक्षित नसल्याचंही क्रांती रेडकर यांनी सांगितले.
क्रूझ ड्रग्ज प्रकरणामुळे समीर वानखेडे चर्चेत आहेत. या प्रकरणात शाहरुख खानच्या मुलासह अनेकांचा समावेश होता. त्यानंतर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी देखील समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. समीर वानखेडे धर्माने मुस्लिम आहे असा आरोप नवाब मलिाकांनी केला आहे. पण नवाब मलिक यांचे आरोप खोटे असल्याचा दावा समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपावर क्रांती रेडकरने लग्नाचे फोटो आणि मॅरेज सर्टफिकेट शेअर करत उत्तर दिलं आहे.
रामदास आठवलेंनी केले समर्थन
रामदास आठवले म्हणाले, "मी नवाब मलिकांना सांगू इच्छितो की समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांवर होत असलेले आरोप थांबवा. समीर वानखेडे जर मुसलमान असते तर त्यांनी मुसलमानांवर आरोप का केले असते. आमचा पक्ष समीर वानखेडेंसोबत आहे. त्यामुळे त्यांना काही त्रास होणार नाही."
NCB : Sameer Wankhede यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी गंभीर आरोप, कोणीतरी घराची रेकी केल्याचा दावा
अनुसूचित जातीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी आज समीर वानखेडे यांची भेट घेतली. यावेळी समीर वानखेडे यांनी गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या धार्मिक आरोपांबाबत अरुण हलदर यांच्यासोबत चर्चा केली. काल सुध्दा या दोघांमध्ये भेट झाली असून यासंदर्भात समीर वानखेडे यांनी काही पुरावे अनुसूचित जातीचे राष्ट्रीय उपाध्यक्षांना सादर केले होते. या सर्व घडामोडींमुळे आता हे प्रकरण चांगलंच रंगलेलं दिसून येत आहे.