Korean singer Lee Sang Eun Passed Away : लोकप्रिय कोरियन गायिका ली संग युन (Korean Singer Lee Sang Eun) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 46 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. परफॉर्मन्सआधी वॉशरुममध्ये त्यांचा मृतदेह सापडला आहे. ली संग युन यांच्या निधनाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण त्यांच्या निधनाने कोरियन संगीतक्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. 


कोरियन मीडियाच्या रिपोर्टनुसार, ली संग युन (Lee Sang Eun) यांचा मृतदेह एका वॉशरुममध्ये सापडला आहे. कार्यक्रमाआधी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीला ली संग युन या वॉशरुममध्ये पडलेल्या दिसल्या. त्यानंतर लगेचच त्या व्यक्तीने कार्यक्रमाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली. कार्यक्रमाआधी ली संग युन यांचं निधन झाल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कार्यक्रमाच्या आयोजकाने दिलेल्या माहितीनुसार, ली संग युन यांच्या परफॉर्मन्सला सुरुवात होणार असल्याने आम्ही त्यांना शोधायला सुरुवात केली. बॅकस्टेजलाही त्या दिसल्या नाहीत. अशातच एक व्यक्ती पळत आला आणि त्या वॉशरुममध्ये पडल्या असल्याचं त्याने आम्हाला सांगितलं". 


ली संग युन यांच्या मृत्यूचा तपास सुरू


ली संग युन यांच्या निधनानंतर त्यांचा मृत्यू कसा झाला? हत्या की आत्महत्या असे प्रश्न उपस्थित होत आहेत. पण अद्याप त्यांच्या निधनाचं कारण समोर आलेलं नाही. पोलिसांनी ली संग युन यांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करायला सुरुवात केली आहे. 


ली संग युन यांच्याबद्दल जाणून घ्या... (Who Is Lee Sang Eun)


ली संग युन या लोकप्रिय गायिका होत्या. एका पेक्षा एक गाणी त्यांनी गायली आहेत. सियोल राष्ट्रीय महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतलं आहे. शिक्षणादरम्यान त्यांना संगीताची गोडी लागली. गायिका असण्यासोबत त्या संगीतकारदेखील होत्या. 


तीन महिन्यांत चार कोरियन गायिकांचं निधन


गेल्या तीन महिन्यांत चार कोरियन गायिकांचं निधन (K Pop Singers Death)  झालं आहे. दोन दिवसांपूर्वीच गायिका कोको लीने (Coco Lee) आत्महत्या केली आहे. गायक चोई सुंह बोंगने (Choi Sung Bong) आत्महत्या केली होती. युट्यूबवर व्हिडीओ पोस्ट करत त्याने आत्महत्येबद्दल सांगितलं होतं. के-पॉप गायक हेसूनेदेखील (Haesoo) गेल्या काही दिवसांपूर्वी आत्महत्या करत आयुष्य संपवलं. आता गायिका ली संग युनच्या निधनाची बातमी समोर आली आहे. 


संबंधित बातम्या


72 Hoorain Box Office Collection : रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर आपटला '72 हुरैन'; जाणून घ्या कलेक्शन...