Konkana Sen on Caste Discrimination Bollywood : बॉलिवूडमध्ये नेपोटिझमचा प्रभाव आहे, हे सर्वज्ञात आहे. स्टार किड्सना सहज प्रोजेक्ट आणि चित्रपट मिळतात. स्टार किड्सना फक्त त्यांच्या नावावर काम मिळतं पण, इंडस्ट्रीच्या बाहेरुन आलेल्यांसाठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम मिळवणं एक आव्हान असतं. इंडस्ट्रीच्या बाहेरुन आलेल्या कलाकारांना बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी आणि नाव कमावण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो, हे सर्वांनाच माहित आहे. पण, तुम्हाला हे माहित नसेल की, बॉलिवूडमध्येही जातीचं राजकारण चालतं. कोण कुठे बसणार? काय खाणार? हे तुमची जात बघून ठरवलं जातं, असा गौप्यस्फोट अभिनेत्री कोंकणना सेन हिने केला आहे. यानंतर मोठी खळबळ माजली आहे.
फिल्म इंडस्ट्रीबाबत अभिनेत्री कोंकणना सेनचा गौप्यस्फोट
अभिनेत्री कोंकना सेन हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीतील मोठं नाव आहे. उत्तम अभिनयाच्या जोरावर तिने नाव कमावलं आहे. याशिवाय, कोंकना सेनने गेल्या 20 वर्षांच्या अभिनयाच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. कोंकनाने अलिकडेच एका मुलाखतीतल बॉलिवूड इंडस्ट्रीचं पितळ उघड पाडलं आहे. कोंकनाने फिल्म इंडस्ट्रीबाबत अनेक खुलासे केले आहे. यातील महत्त्वाचं म्हणजे तुमची जात पाहून त्यानुसार, तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये वागणूक दिली जाते, असं कोकनानं सांगितलं आहे.
"सेटवर मुलींसोबत अश्लील चाळे"
कोकनाने सांगितलं की, सेटवर मुलींसोबत अश्लील चाळे केले जातात आणि इंडस्ट्रीमधील दिग्गज लोक असं आक्षेपार्ह वर्तन करतात, यामुळेच कुणी याविरोधात आवाज उठवत याचा विरोध करत नाही. इंडस्ट्रीमध्ये जातीच्या आधारे भेदभाव करत लोकांना तुच्छ वागणूक दिली जाते. कोंकनाने सुचरिता त्यागी यांना दिलेल्या मुलाखतीत हे गौप्यस्फोट केले आहेत.
"हे सर्व जातीच्या आधारे ठरवलं जातं"
मल्याळम इंडस्ट्रीतील लैंगिक छळाबद्दल बोलताना कोंकना सेन पुढे म्हणाली की, "चित्रपटाच्या सेटवर आणि पूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाती आणि क्लासच्या आधारे लोकांसोबत भेदभाव केला जातो. कुणी कुठे बसायचं? बसायची परवानगी आहे की नाही? कुणी काय खायचं? बाथरुम कोण वापरणार? हे सर्व जातीच्या आधारे ठरवलं जातं".
महत्त्वाच्या इतर बातम्या :