Sayaji Shinde Life Story : प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी त्यांच्या दमदार अभिनयाच्या जोरावर स्वत:चा वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. सयाजी शिंदे यांनी फक्त मराठी चित्रपटसृष्टीतचनाही तर बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह अनेक भाषांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाची छाप पाडली आहे. एक उत्कृष्ट खलनायक म्हणून त्यांनी नाव कमावलं. चित्रपटात निगेटिव्ह भूमिका करण्यासाठी त्यांची खास ओळख आहे. अनेक चित्रपटातून त्यांनी दमदार अभिनयाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे, आता हा अभिनेता राजकारणात धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे.


वॉचमनची नोकरी, महिना 165 रुपये पगार


सयाजी शिंदे हे फिल्म इंडस्ट्रीमधील मोठं नाव आहे. या मराठमोळ्या अभिनेत्याने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीसह साऊथ चित्रपटसृष्टीतही नाव कमावलं आहे. सयाजी शिंदे यांनी आता राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. अभिनेता सयाजी शिंदे यांनी  अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केला आहे. सयाजी शिंदे यांचा अभिनेता ते राजकारणी होण्यापर्यंतचा प्रवास जाणून घ्या.


मराठमोळा अभिनेता बनला खलनायक


सयाजी शिंदे यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठा नाव कमावलं आहे. मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका उत्कृष्टरित्या साकारली आहे. पण, त्यांचा इथंपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. सुरुवातीच्या काळात त्यांनी वॉचमनची नोकरीही केली.  नाटकांमधून अभिनयाला सुरुवात करणारे सयाजी शिंदे आज इंडस्ट्रीमधील मोठं नाव बनलं आहे. सयाजी शिंदेंनी मराठी नाटकांबरोबरच मराठी, हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड, मल्याळम, इंग्रजी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 


महिना 165 रुपये पगार


सयाजी शिंदे यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका छोट्या गावात शेतकरी कुटुंबात झाला. पुढे ते गाव सोडून सातारा शहरात राहू लागले. त्यावेळी त्यांनी वॉचमनचं कामही केलं. सकाळी कॉलेज आणि त्यानंतर रात्र पाळीला चौकीदार म्हणून काम करत असताना त्यांनी मराठीतून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलं. त्यावेळी सयाजी शिंदे यांना महिना 165 रुपये होता. सयाजी यांनी नाट्यकलाकार सुनील कुलकर्णी यांची साताऱ्यात भेट घेतली. येथून त्याचे नशीब बदललं. 


'शूल' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण


सयाजी शिंदे यांनी 1978 मध्ये एका मराठी स्पर्धेद्वारे अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'झुलवा' या मराठी नाटकातील त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. तेव्हापासून त्यांच्या अभिनयाला दाद मिळाली. सयाजी शिंदे नियमितपणे नाटकांतून काम करू लागले. अभिनयाच्या जास्त संधी मिळाव्यात यासाठी त्यांनी मुंबई गाठली. मुंबईत अनेक थिएटर वर्कशॉप करून त्यांनी अभिनयाचा अभ्यास पूर्ण केला. थिएटर करत असतानाच त्यांना 'अबोली' हा चित्रपट मिळाला. अबोलीत त्यांची भूमिका खूप गाजली. 'अबोली' हा चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारानेही गौरविण्यात आलं. थिएटर आणि मराठी चित्रपट करताना सयाजींना पहिला हिंदी चित्रपट मिळाला. ‘शूल’ चित्रपटानंतर सयाजी शिंदे यांनी मागे वळून पाहिले नाही. या चित्रपटातील बच्चू यादवची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. त्यांनी अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Singham Re-Release : Singham Again च्या रिलीजपूर्वी रोहित शेट्टीची चाहत्यांना मोठी भेट, सिंघम पुन्हा मोठ्या पडद्यावर; चाहते म्हणाले, 'आम्ही याचीच वाट पाहत होतो'