Aishwarya-Abhishek Divorce : अभिषेक बच्चनकडून ऐश्वर्या रायला प्रेमात धोका, 'ही' अभिनेत्री आहे घटस्फोटाचं कारण? व्हायरल पोस्ट चर्चेत
स्नेहल पावनाक | 12 Oct 2024 01:08 PM (IST)
Abhishek Cheated on Aishwarya Rai : अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्यातील नातं संपल्याची एक रेडिट पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये अभिषेकने ऐश्वर्याला चीट केल्याचं बोललं जात आहे.
Did Abhishek Bachahan Cheated on Aishwarya Rai Post Viral
Abhishek Bachchan Cheating Rumours : विश्वसुंदरी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या वर्षभरापासून कानावर येत आहेत. ऐश्वर्या आणि तिची मुलगी बच्चन कुटुंबासोबत राहत नसल्याने या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यानंतर अंबानी कुटुंबाच्या लग्नात अमिताभ, अभिषेक, जया आणि मुलीसह पोहोचले, पण ऐश्वर्या राय तिच्या मुलीसह आराध्यासह वेगळी पोहोचल्याचं दिसलं. यानंतरच या कपलच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांना हवा मिळाली. या दोघांनीही घटस्फोटाच्या बातम्यांवर कोणतंही स्पष्टीकरण मिळालं नाही, त्यामुळेच या दोघांचा लवकरच घटस्फोट होणार असल्याचं बोललं जात आहे.
अभिषेक-ऐश्वर्या यांचा घटस्फोट होणार?
ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंब यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याचं बोललं जात असतानाच आता एक सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचं नात संपलं असल्याचं व्हायरल पोस्टमध्ये बोललं जात आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्यासंदर्भातील एक पोस्ट चर्चेत आली आहे. महत्त्वाचं म्हणजे अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायला प्रेमात धोका दिला असल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात येत आहे. अभिषेकने ऐश्वर्याला धोका दिल्याने ऐश्वर्या आणि त्याच्या नात्यात दुरावा आला असल्याचं या पोस्टमध्ये सांगितलं आहे.
अभिषेक बच्चनकडून ऐश्वर्याला धोका?
आता एक रेडिट पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा केला जात आहे की हे कपल आता वेगळं होणार आहे. अभिषेक बच्चनने पत्नी ऐश्वर्याला धोका दिल्याचा दावा यामध्ये करण्यात आला आहे. Reddit वर व्हायरल झालेल्या या पोस्टमध्ये युजरने म्हटले आहे की, अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये खूप दुरावा आला आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या इतके एकमेकांपासून दिवस वेगळं राहण्याचं कारण अभिषेकने तिला प्रेमात धोका दिल्याने असल्याचे युजरने म्हटले आहे. अभिषेक बच्च्नने दसवी चित्रपटातील त्याची को-स्टार निम्रत कौर रिलेशनमध्ये राहून ऐश्वर्याला धोका दिल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
अभिषेक बच्चनच्या अफेअरबद्दलची पोस्ट चर्चेत
या सर्व बातम्यांदरम्यान, अभिषेक बच्चनने पत्नी ऐश्वर्या रायची फसवणूक केल्याचा हा दावा धक्कादायक असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. निम्रत कौरसोबतच्या अभिषेकच्या जवळीकमुळे ऐश्वर्या त्याच्यापासून दूर गेल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्याव, अनेक नेटकऱ्यांनी या दावा दिशाभूल करणारा असून या अफवा असल्याचं म्हटलं आहे. तर अनेकांना त्या दाव्यामध्ये काहीतरी तथ्य असल्याचेही वाटत आहे.