Koffee With Karan E8 Promo :  बॉलिवूडमधील दिग्दर्शक करण जोहरचा (karan johar) 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) हा टॉक शो चर्चेत असतो. सध्या या कार्यक्रमाचा सातवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. वेगवेगळे सेलिब्रिटी या शोमध्ये हजेरी लावतात. नुकताच या कार्यक्रमाच्या नव्या एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) हे करणसोबत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलत आहेत. या नव्या एपिसोडमध्ये शाहिद आणि करण हे सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियाराच्या नात्याबाबत चर्चा करताना दिसत आहेत. 


गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या नात्याबाबत चर्चा सुरु आहे. हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत, असं म्हटलं जात आहे. आता कॉफी विथ करणच्या नव्या एपिसोडच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, करण हा कियाराला सिद्धार्थबाबत विचारतो. यावेळी कियारा म्हणते,'आमचं नातं हे मैत्रीच्या पलिकडचे आहे.' त्यानंतर शाहिद म्हणतो, 'यांची जोडी छान आहे' तर करण म्हणतो, 'यांची मुलं पण छान असतील' आता कॉफी विथ करणच्या या एपिसोडचा प्रोमो व्हायरल झाल्यानंतर प्रेक्षक या एपिसोडची उत्सुकतेने वाट बघत आहेत. हा सातव्या सिझनमधील आठवा एपिसोड आहे. कियारा आणि शाहिद यांचा हा एपिसोड गुरुवारी (25 ऑगस्ट) रिलीज होणार आहे. कियारा आणि शाहिद यांच्या कबिर सिंह या चित्रपटानं काम केलं.  या चित्रपटातील या दोघांच्या केमिस्ट्रीनं प्रेक्षकांची मनं जिंकली. आता कबिर आणि प्रितीच्या या जोडीला पुन्हा कॉफी विथ करणमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.  


पाहा प्रोमो: 






काय म्हणाला होता सिद्धार्थ? 


काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ मल्होत्रा आणि विकी कौशल यांनी कॉफी विथ करणमध्ये हजेरी लावली होती. यावेळी कियारासोबत लग्न करणार? या करणच्या प्रश्नाला सिद्धार्थनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले. सिद्धार्थ म्हणतो, 'मी चांगल्या भविष्यासाठी प्रार्थना करतो.' 


कॉफी विथ करणमध्ये वेगवेगळे सेलिब्रिटी हजेरी लावतात. या कार्यक्रमामध्ये सेलिब्रिटी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा करतात. कॉफी विथ करणचा आगामी एपिसोड तुम्ही गुरुवारी (16 ऑगस्ट) सकाळी 12 वाजता पाहू शकता. सारा अली खान, जान्हवी कपूर, अनन्या पांडे, विजय देवरकोंडा, आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांनी या कार्यक्रमात हजेरी लावली होती.


 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: