Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण 8' (Koffee With Karan 8) हा लोकप्रिय टॉक शो कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) हजेरी लावणार होते. या कार्यक्रमाच्या मंचावर त्यांनी आपल्या रिलेशनबद्दल भाष्य केलं. तर दुसऱ्या भागात बॉबी देओल (Bobby Deol) आणि सनी देओल (Sunny Deol) यांनी हजेरी लावली होती. आता या पर्वाच्या तिसऱ्या भागात सारा अली खान (Sara Ali Khan) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) हजेरी लावणार आहेत. 


कार्तिक आर्यनसोबतच्या ब्रेकवर पहिल्यांदाच बोलली सारा अली खान


'कॉफी विथ करण 8'च्या मंचावर सारा अली खानने पहिल्यांदाच कार्तिक आर्यनसोबतच्या रिलेशनवर (Sara Ali Khan On Kartik Aaryan Breakup) भाष्य केलं आहे. करण जौहरने विचारलं की,"नातं संपल्यानंतर मैत्री कायम ठेवणं ही सोपी गोष्ट आहे का?". याचं उत्तर देत सारा अली खान म्हणाली,"मैत्री असो, व्यावसायिक काम असो वा नातं असो. मी एखाद्या गोष्टीवर माझा वेळ खर्च करत असेल तर मला या कोणत्या गोष्टीचा फरक पडत नाही". 


सारा अली खान पुढे म्हणाली,"आता तुम्ही कोणत्या परिस्थितीचा सामना करत आहात किंवा दुसऱ्या दिवशीचं तुमचं आयुष्य कसं असणार आहे या सर्व गोष्टींचा खूप फरक पडत असतो. पण तुम्ही एखाद्या गोष्टीत न अडकता पुढे जायला हवे. इंडस्ट्रीत कधीच कोणी कोणाचा मित्र नसतो. आज एखादी व्यक्ती तुमच्यासोबत बोलत असेल तर ती व्यक्ती कदाचीत उद्या तुमच्यासोबत बोलणारदेखील नाही. परिस्थितीनुसार तुमची मैत्री अवलंबून असते". 


सारा अली खान आणि कार्तिक आर्यन गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. करण जोहरने (Karan Johar) स्वत: या प्रकरणाचा खुलासा केला आहे. पण काही कारणाने त्यांचं नातं बिनसलं आणि त्यांचा ब्रेकअप झाला. अनन्या आणि कार्तिकदेखील काही वेळ डेट करत होते. करणने स्वत: याबद्दल माहिती दिली आहे. एकंदरीत कार्तिकला डेट करणाऱ्या दोन्ही अभिनेत्रींना करणने एका मंचावर बोलावलं.


बॉलिवूडमध्ये पर्मनंट  काहीच नाही : सारा अली खान


सारा अली खान म्हणाली की,"इंडस्ट्रीत तुमचा कोणी पर्मनंट मित्र असू शकत नाही. आज तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत चांगला बोलता तर दुसऱ्या दिवशी त्याच व्यक्तीबद्दल तुम्ही वाईट बोलता. इंडस्ट्रीतील मैत्री आयुष्यभर टिकत नाही". 


संबंधित बातम्या


Koffee With Karan 8: देशाला लागलेली उत्सुकता अखेर संपली, शुभमन गिल कुणाला डेट करतोय, साराने नाव फोडलं!