Diwali movie releases 2023 : सिनेप्रेक्षकांसाठी यंदाची दिवाळी (Diwali 2023) खूपच खास असणार आहे. दिवाळीत एकीकडे ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या जॉनरचे, धाटणीचे, विविध विषयांवर भाष्य करणारे सिनेमे प्रदर्शित होत आहेत. तर दुसरीकडे सिनेमागृहातही अनेक सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. 


दिवाळीत बॉक्स ऑफिसवर बिग बजेट सिनेमांची टक्कर होणार आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) 'टायगर 3' (Tiger 3) हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच मराठी सिनेमेही प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर 'टायगर 3' आणि 'श्यामची आई' (Shyamchi Aai), 'नाळ 2' (Naal 2) आणि 'झिम्मा 2' (Jhimma 2) या सिनेमांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे.


टायगर 3 (Tiger 3)
कधी होणार रिलीज? 12 नोव्हेंबर 2023


बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) 'टायगर 3' (Tiger 3) हा सिनेमा 12 नोव्हेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. आता या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. सलमानचा 'टायगर 3' हा सिनेमा शाहरुखच्या 'जवान'चा (Jawan) रेकॉर्ड ब्रेक करणार का हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 'टायगर 3' या सिनेमाची सिनेरसिक आतुरतेने वाट पाहत आहेत. सलमान खान आणि कतरिना कैफ या सिनेमात मुख्य भूमिमेक दिसणार आहेत. त्यांना पुन्हा एकत्र पाहणं ही प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे.


नाळ 2 (Naal 2)
कधी होणार रिलीज? 10 नोव्हेंबर 2023


नागराज मंजुळेंच्या (Nagraj Manjule) 'नाळ 2' या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. सुधाकर रेड्डी यंकट्टी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. या सिनेमातील चिमुकल्या चैत्याने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली आहे. या सिनेमाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं असून दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. नाळ सिनेमाच्या माध्यमातून नागराज मंजुळेंनी अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं होतं. 


झिम्मा 2 (Jhimma 2)
कधी होणार रिलीज? 24 नोव्हेंबर


'टायगर 3' प्रदर्शित झाल्यानंतर 'झिम्मा 2' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बहुचर्चित सिनेमाचीदेखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 'झिम्मा 2' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा हेमंत ढोमेने सांभाळली आहे. सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या या सिनेमात दमदार भूमिका आहेत. तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करेल.


संबंधित बातम्या


Jhimma 2 : 'मराठी पोरी' दुनियेला दाखवती माज.. बाईपण जपणारं 'झिम्मा 2'मधील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; युट्यूबवरही ट्रे़डिंग