KK Death Anniversary : लोकप्रिय गायक केके (KK) म्हणजेच कृष्ण कुमार कुननाथ यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांच्या निधनाला एक वर्ष झालं असलं तरी आजही त्यांची गाणी चाहते आवडीने ऐकतात. 31 मे 2022 रोजी कोलकाता येथील एका लाईव्ह कार्यक्रमादरम्यान केके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पण निधनानंतरही ते त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात जिवंत आहेत. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त (KK Death Anniversary) जाणून घ्या त्यांच्या सर्वोत्कृष्ट गाण्यांबद्दल...


जरा सी दिल में दे जगह तू : अमरान हाशमीच्या (Emraan Hashmi) 'जन्नत' (Jannat) या सिनेमातील 'जरा सी दिल में दे जगह तू' हे गाणं केके यांनी गायलं होतं. हे रोमॅंटिक गाणं त्यावेळी चाहत्यांच्या पसंतीस उतरलं होतं. 


हम रहें या न रहें कल : केके यांनी 'हम रहें या न रहें कल' हे गाणं शेवटचं गायलं. त्यांच्या निधनानंतर त्यांचा हे गाणं गातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. 


तडप तडप के इस दिल से : सलमान खान, ऐश्वर्या राय आणि अजय देवगनच्या 'हम दिल दे चुके सनम' या सिनेमातील 'हम दिल दे चुके सम' या गाण्याच्या माध्यमातून केके यांनी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. 


यारों दोस्ती बडी हसीन है : नव्वदच्या दशकात केके यांनी गायलेलं 'यारों दोस्ती बडी हसीन' हे गाणं खूपच लोकप्रिय झालं होतं. मैत्रीवर आधारित असलेलं हे गाणं आजही आवडीने ऐकलं जातं. 


जरा सी : 'जन्नत' या सिनेमातील 'जरा सी' या गाण्याने 2008 साली अनेक रेकॉर्ड केले. युट्यूबवर हे गाणं 60000000 लोकांनी पाहिलं आहे. 


तुने मारी एन्ट्री : प्रियांका चोप्रा, रणवीर सिंह आणि अर्जुन कपूरच्या 'गुंडे' या सिनेमातील 'तुने मारी एन्ट्री' या गाण्याने केके यांची लोकप्रियता चांगलीच वाढली. 


ओम शांती ओम : 'ओम शांती ओम' या सिनेमातील 'ऑंथो में तेरी अजब सी' हे गाणं आजही चाहते आवडीने ऐकतात. केके यांच्या सर्वोत्कृष्ट गाण्यांच्या यादीत या गाण्याची गणना होते. 


खुदा जाने : 'बचना ए हसीनो' या सिनेमातील 'खुदा जाने' हे गाणं अनेक दिवस नंबर वनवर होतं. रणबीर कपूर और दीपिका पादुकोणची केमिस्ट्री या गाण्यात पाहायला मिळाली.


वेड लागले हे : 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या फ्रेंडशिप डॉट कॉम या चित्रपटामधील 'वेड लागले हे' गाणं केके यांनी गायले आहे. या गाण्यामधून केके यांनी मराठी संगीत क्षेत्रात पदार्पण केलं.


संबंधित बातम्या


KK Birth Anniversary : सेल्समन ते बॉलिवूडचा लोकप्रिय गायक! ‘असा’ होता केके यांचा संगीतप्रवास...