Top Action Thriller Movies On Netflix: वीकेंडला ओटीटीवरील (OTT) चित्रपट आणि वेब सीरिज (Web Series) बघायला प्रेक्षकांना आवडतात.  नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ट्रेंड होणारे चित्रपट आणि वेब सीरिज पाहण्यास प्रेक्षक प्राधान्य देतात.  प्रेक्षकांमध्ये अॅक्शन आणि थ्रिलर चित्रपटांची वेगळी क्रेझ आहे. तुम्ही अॅक्शन आणि थ्रिलचा तडका असणाऱ्या चित्रपटांचे चाहते असाल, तर नेटफ्लिक्सवरील हे हिंदीत डब केलेले चित्रपट तुम्ही पाहू शकता. 


 'द डार्क नाइट (The Dark Knight)' 


ख्रिस्तोफर नोलन यांनी द डार्क नाइट  या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाला IMDb वर 9 रेटिंग देण्यात आले आहे.


'द ओल्ड गार्ड (The Old Guard)'


चार्लीझ थेरॉन आणि हॅरी मीलिंग स्टारर 'द ओल्ड गार्ड (The Old Guard)' या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. हा चित्रपट तुम्ही हिंदीमध्ये पाहू शकता. 2020 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. 


'ट्रिपल फ्रंटियर (Triple Frontier)'


IMDb कडून 6.4 रेटिंग मिळालेल्या ट्रिपल फ्रंटियर या अॅक्शन आणि थ्रिलर चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. या उत्कृष्ट चित्रपटाचे दिग्दर्शन जेसी चंदर यांनी केले आहे.


 'प्रोजेक्ट पावर (Project Power)'


 'प्रोजेक्ट पावर या चित्रपटाला IMDb वर या चित्रपटाला 6 रेटिंग देण्यात आले आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं आजही अनेकजण कौतुक करतात. 2020 मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. 


'इंसेप्शन (Inception)'


प्रसिद्ध अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रियोच्या  (Leonardo DiCaprio)  या चित्रपटात स्वप्नांची दुनिया, अॅक्शन आणि थ्रिलर दाखवण्यात आले आहे. IMDb वर 8.8 रेटिंग मिळालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन क्रिस्टोफर नोलन यांनी केले आहे.


'एक्सट्रॅक्शन (Extraction)'


एक्सट्रॅक्शन हा अॅक्शन आणि थ्रिलचा तडका असणाऱ्या ख्रिस हेम्सवर्थ स्टारर  या चित्रपटातील अॅक्शन सीन्सचे अनेकांनी कौतुक केले. हा चित्रपट सॅम हारग्रेव्हने दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट तुम्ही हिंदी भाषेमध्ये पाहू शकता.   एक्सट्रॅक्शन हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 






इतर महत्वाच्या बातम्या:


'कटहल' ते 'द मदर'; नेटफ्लिक्सवर मनोरंजनाची मेजवानी, घरबसल्या पाहा हे ट्रेंडिंग चित्रपट