Ira Khan Wedding:  अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) मुलगी इरा खान (Ira Khan) ही लवकरच बोहल्यावर चढणार आहे. इरा ही तिचा बॉयफ्रेंड नुपुर शिखरेसोबत (Nupur Shikhare) लग्नगाठ बांधणार आहे. इराच्या प्री वेडिंग फंक्शन्सला सुरुवात झाली आहे.   इरा आणि नुपुर यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला  रीना दत्ता (Reena Dutta) आणि किरण राव (Kiran Rao) या आमिरच्या दोन्ही एक्स वाईफ्सनं हजेरी लावली.  यावेळी रीना दत्ता आणि किरण राव यांनी मराठमोळा लूक केला होता. 


रीना दत्ता आणि किरण राव यांचा लूक


किरण राव आणि रीना दत्ता या  गिफ्ट घेऊन नुपुर शिखरेच्या घरी पोहोचल्या आहेत. यावेळी किरण रावनं  जांभळ्या रंगाची नऊवारी, केसांमध्ये गजरा असा मराठमोळा लूक केला होता. तर रीनानं देखील हिरव्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती.






प्री-वेडिंग फंक्शन्ससाठी शिखरच्या नातेवाईक देखील त्याच्या घरी येत आहेत. नुपूर शिखरेनं प्री-वेडिंग फंक्शनसाठी लाल कुर्ता आणि पांढऱ्या पायजमा असा लूक केला आहे. त्याने पापाराझीसाठी आपल्या कुटुंबासह पोज देखील दिल्या.






इराच्या लग्नसोहळ्याच्या आधी आमिर खानचे मुंबईतील घर लाइट्सनं सजलं आहे. इरानं  इंस्टाग्राम आऊंटवर तिच्या केळवणाच्या कार्यक्रमाचे फोटो गेल्या काही दिवसांपासून शेअर करत होती.  


इरा ही 3 जानेवारीला नुपुर शिखरेसोबत लग्नगाठ बांधली आहे. 10 जानेवारी रोजी इरा आणि नुपुर यांचे रिसेप्शन पार पडणार आहे, असं म्हटलं जात आहे.


जाणून घ्या नुपूरबद्दल...


आयराचा होणारा पती नुपूर हा  फिटनेस ट्रेनर आहे. नुपूर हा त्याचे वर्क आऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. आयरा आणि नुपूर दोघेही 2020 पासून एकमेकांना डेट करत आहेत. 


संबंधित बातम्या


Ira Khan Wedding : आमिर खानची लेक इरा अडकणार लग्नबंधनात! महाराष्ट्रीयन पद्धतीने होणार विवाहसोहळा; प्री वेडिंग फंक्शन ते रिसेप्शन; जाणून घ्या सर्वकाही