Shiv Thakare : 'आपला माणूस' शिव ठाकरे (Shiv Thakare) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सध्या तो 'झलक दिखला जा 11' (Jhalak Dikhhla Jaa 11) या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अशातच आता तो एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. शिवने मुंबईत आलिशान घर घेतलं आहे. अमरावतीचा पोट्टा आता मुंबईकर झाला आहे.


नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच शिवने मुंबईत आलिशान घर घेतलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने 30 लाख रुपयांची नवी गाडी घेतली होती. शिवने नव्या घरात पूजा केली आहे. नवीन घर घेतल्यानिमित्ताने फराह खानने शिवला एक गणेश मूर्ती भेट दिली आहे. 


2023 हे वर्ष माझ्यासाठी खूप खास : शिव ठाकरे


नवीन घर विकत घेतल्यानंतर शिव ठाकरे म्हणाला,"2023 हे वर्ष माझ्यासाठी खूपच खास होतं. या वर्षात आयुष्यात अनेक गोष्टी बदलल्या. सेकेंड हँड कार खरेदी करण्याची माझी इच्छा होती. पण या वर्षात मी 30 लाख रुपयांची नवी कार विकत घेतली".


मुंबईत स्वत:चं घर घेणं शिव ठाकरेचं स्वप्न


शिव पुढे म्हणाला,"मुंबईत स्वत:चं घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. घराच्या वाढत्या किंमती आणि कर्जाचे हप्ते यात संपूर्ण आयुष्य जातं. अखेर याच मुंबईत मी हक्काचं आलिशान घर घेतलं आहे. आठ दिवसांपूर्वीच मी नवीन घर घेतलं आहे".


शिव ठाकरेबद्दल जाणून घ्या...


छोट्या पडद्यावरील अनेक रिअॅलिटी शोमध्ये शिव ठाकरे सहभागी झाला आहे. एमटीवीचा रोडीज, बिग बॉस मराठी 2, बिग बॉस 16 अशा अनेक कार्यक्रमांत शिव सहभागी झाला असून त्याची खेळी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. 






शिवने केलंय वृत्तपत्र विकण्याचं काम


शिव ठाकरे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला असला तरी आजही त्याचे पाय जमिनीवर आहेत. कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं हे ध्यानात ठेऊन शिव ठाकरेने आयुष्य जगायला सुरुवात केली आहे. मनोरंजन विश्वात येण्याआधी शिवने वृत्तपत्र विकण्याचे काम केले आहे. तसेच तो घरोघरी जाऊन दुधाच्या पिशव्यांची विक्री करत होता. पुढे डान्सची आवड असल्याने त्याने डान्स क्लास घ्यायला सुरुवात केली. यासर्व कामांतून मिळणारे पैसे शिव त्याच्या आईला देत असे.


संबंधित बातम्या


Abdu Rozik : 'झलक दिखला जा 11' गाजवण्यास अब्दू रोझिक सज्ज! लाडक्या शिव ठाकरेला करणार सपोर्ट