एक्स्प्लोर

सीतेच्या भूमिकेत येणार कियारा अडवानी

राम जर प्रभास असेल तर लक्ष्मण आणि सीता कोण असणार याची उत्सुकताही अनेकांना आहे. ती उत्सुकता आता संपली आहे.

ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष या सिनेमाची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. प्रभासने आपल्या इन्स्टा अकाऊंटवरून सिनेमाचं एकेक पोस्टर टाकायला सुरूवात केली आहे. काही दिवसांपूर्वी त्याने या सिनेमात लंकेश सैफ अली असणार असल्याचं जाहीर केलं. हा चित्रपट रामायणावर आधारलेला असणार आहे. यात प्रभास रामाची भूमिका साकारणार आहे. राम जर प्रभास असेल तर लक्ष्मण आणि सीता कोण असणार याची उत्सुकताही अनेकांना आहे.

रामायणात अनेक महत्वाच्या व्यक्तिरेखा आहेत. यात आवर्जून उल्लेख करायला हवा तो राम, सीता, लक्ष्मण, रावण, दशरथ आदींचा समावेश होतो. या चित्रपटात प्रभास हा रामाच्या भूमिकेत असणार आहे. तर सैफ रावणाच्या भूमिकेत असेल. आता या सिनेमात सीतेच्या भूमिकेत कियारा आडवानी असेल. कियाराने यापूर्वी कबीर सिंग, गुड न्यूज या सिनेमात कामं केली आहेत. तिच्या या दोन्ही सिनेमातल्या भूमिकांचं मोठं कौतुक झालं आहे. आता तिला आदिपुरुषमध्ये सीता बनून येण्याची संधी मिळाली आहे.

मुंबई मराठी माणसाच्या बापाचीच... कंगनाच्या ट्वीटला संजय राऊत यांचं उत्तर

या सिनेमाचं दिग्दर्शन ओम राऊत करणार आहे. या सिनेमात इतर व्यक्तिरेखा कोण कोण साकारणार आहे ते अद्याप नक्की नाहीय. पण हा प्रोजेक्ट खूप मोठा असल्याने अनेक चांगले, तगडे कलाकार या सिनेमातल्या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये असणार आहेत. या सिनेमाचं बजेटही साडेतीनशे कोटींचं असेल असं बोललं जातं.

ओम राऊतने दिग्दर्शित केलेल्या तान्हाजी - द अनसंग वॉरिअर या सिनेमाला तुफान प्रतिसाद मिळाला होता. या सिनेमाने साडेतीनशे कोटींची कमाई केली होती. त्यात अजय देवगण आणि सैफ अली यांची जुगलबंदी पाहायला मिळाली होती. सैफ आणि ओम राऊतची हीच केमिस्ट्री पुन्हा एकदा आदिपुरुष या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी उत्तरार्धात रसिकांच्या भेटीला येईल असं बोललं जातं.

Mumbaikars angry on #Kangana ए कंगना, ऐक ना! मुंबईकरांचा कंगनावर संताप, ऐका काय म्हणतायत मुंबईकर!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nagraj Manjule On Gulshan Grover: लहानपणी सिनेमात पाहिलेला बॅड मॅन; नागराज मंजुळेंनी 'गुलशन ग्रोव्हर'ला कास्ट करताच सांगितली आठवण
लहानपणी सिनेमात पाहिलेला बॅड मॅन; नागराज मंजुळेंनी 'गुलशन ग्रोव्हर'ला कास्ट करताच सांगितली आठवण
मराठीत पहिल्यांदाच अनुभवा ‘सिनेमॅटिक युनिव्हर्स’; हॉरर सिनेमा ‘घबाडकुंड’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
मराठीत पहिल्यांदाच अनुभवा ‘सिनेमॅटिक युनिव्हर्स’; हॉरर सिनेमा ‘घबाडकुंड’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Samay Raina: FIR दाखल होताच मोबाईलमध्ये सगळ्यात पॉवरफुल नंबर शोधला; फोन करताच काय घडलं?, समय रैनाने सगळं सांगितलं!
FIR दाखल होताच मोबाईलमध्ये सगळ्यात पॉवरफुल नंबर शोधला; फोन करताच काय घडलं?, समय रैनाने सगळं सांगितलं!
Zareen Khan Mother Death: सलमान खानच्या अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर; झरीन खानच्या आईचं निधन, दीर्घ आजारानंतर घेतला जगाचा निरोप
सलमान खानच्या अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर; झरीन खानच्या आईचं निधन, दीर्घ आजारानंतर घेतला जगाचा निरोप

व्हिडीओ

Cockroach Found In Vande Bharat Meal : झुरळ खिचडीत रेल्वे अडचणीत Special Report
Pune Cyber Scam : 54 कोटींच्या आमिषाला भुलले अन् 12 कोटी गमावले Special Report
Eknath Shinde : पक्षाचं काम केलं नाही तर पदावरून हटवणार, एकनाथ शिंदेंचा इशारा, बैठकीतील Inside Story
Rahuri Election: राहुरीत ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्याची अपक्ष उमेदवारी; रावसाहेब खेवरेंचा भाजपवर हल्ला
Sanjay Savkare Nandurbar : सुनेत्रा पवार बारामतीतून निवडून येणार- संजय सावकारे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युद्धातून मैत्रीकडे? इराणसोबत काम करण्याची तयारी, निर्बंध सैल होण्याचे संकेत, ट्रम्प यांचा मोठा दावा
युद्धातून मैत्रीकडे? इराणसोबत काम करण्याची तयारी, निर्बंध सैल होण्याचे संकेत, ट्रम्प यांचा मोठा दावा
इस्त्रायलचा लेबनॉनवर हल्ला, 89 जणांचा मृत्यू, आखाती देशांमध्ये तणाव वाढला, इराणचा अमेरिकेला थेट इशारा
इस्त्रायलचा लेबनॉनवर हल्ला, 89 जणांचा मृत्यू, आखाती देशांमध्ये तणाव वाढला, इराणचा अमेरिकेला थेट इशारा
GT vs DC IPL 2026 : डेव्हिड मिलरनं दिल्लीला विजयाजवळ पोहोचवलं पण एका निर्णयानं पराभवाचा झटका, गुजरातचा पहिला विजय
केएल राहुलचं अर्धशतक वाया, डेव्हिड मिलरचा एक निर्णय अन् दिल्लीचा पराभव, गुजरातचा रोमांचक लढतीत विजय
Iran : शस्त्रसंधीचा भंग होताच इराण भडकला, होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली, थेट जहाजं उडवण्याची धमकी, ट्रम्प काय करणार?
शस्त्रसंधीचा भंग होताच इराण भडकला, होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली, थेट जहाजं उडवण्याची धमकी, ट्रम्प काय करणार?
Pune Cyber Fraud : शेअर बाजारातून 11 दिवसांत 54 कोटी मिळवून देतो; हडपसरमध्ये 75 वर्षांच्या आजोबांना 12.31 कोटींचा गंडा
शेअर बाजारातून 11 दिवसांत 54 कोटी मिळवून देतो; हडपसरमध्ये 75 वर्षांच्या आजोबांना 12.31 कोटींचा गंडा
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?
परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
Embed widget