Kiara Advani New Car : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) सध्या तिच्या आगामी 'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem Ki Katha) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात ती अभिनेता कार्तिक आर्यनसोबत (Kartik Aaryan) झळकणार आहे. दरम्यान कियाराने लग्नानंतर स्वत:साठी एक मगागडी आलिशान गाडी खरेदी केली आहे. 


कियारा आणि कार्तिकचा 'सत्यप्रेम की कथा' हा सिनेमा 29 जून 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या रिलीजआधी अभिनेत्रीने आता नवी गाडी खरेदी केली आहे. कियाराने काळ्या रंगाची मर्सिडीज घेतली आहे. कियाराने खरेदी केलेल्या Mercedes Maybach S580 ची किंमत 2.70 कोटी असल्याचे म्हटले जात आहे. सिद्धार्थसोबत लग्न केल्यानंतर कियाराने पहिल्यांदाच एक महागडी गाडी खरेदी केली आहे. 






कियाराने खरेदी केलेल्या नव्या गाडीबद्दल जाणून घ्या... (Mercedes Maybach S580) 


कियारा आडवाणीने काळ्या रंगाची मर्सिडीज खरेदी केली आहे. कियाराने खरेदी केलेल्या Mercedes Maybach S580 या गाडीची किंमत 2.69 कोटी ते 3.73 कोटी असल्याचं म्हटलं जात आहे. या गाडीचं इंजिन 3983 ते 5980 सीसी पावरचं आहे. 


कियाराच्या 'सत्यप्रेम की कथा'ची चाहत्यांना उत्सुकता 


कियारा आडवाणी आणि कार्तिक आर्यनचा 'सत्यप्रेम की कथा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून कियारा आणि कार्तिक दुसऱ्यांदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याआधी 'भूल भूलैया 2' या सिनेमात ते एकत्र झळकले होते. आता 'सत्यप्रेम की कथा' या सिनेमात कार्तिक-कियारासह सुप्रिया पाठक, गजराज राव, सिद्धार्थ रंधेरिया, अनुराधा पटेल, राजपाल यादव, निर्मिती सावंत आणि शिखा तलसानिया महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 


कियाराच्या आगामी प्रोजेक्टबद्दल जाणून घ्या... (Kiara Advani Upcoming Project) 


कियाराचा 'सत्यप्रेम की कथा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. तसेच दाक्षिणात्य अभिनेता राम चरणसोबत ती 'गेम चेंजर' या सिनेमात दिसणार आहे. याआधीदेखील तिने राम चरणसोबत काम केलं होतं. 2019 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'विनय विद्या राम' या सिनेमात ती राम चरणसोबत दिसली होती. 


संबंधित बातम्या


Satyaprem Ki Katha Teaser: कियारा आणि कार्तिकचा रोमँटिक अंदाज; ‘सत्यप्रेम की कथा’ चा टीझर रिलीज