Khurchi Trailer Release:  अभिनेता अक्षय वाघमारे (Akshay Waghmare) आणि  राकेश बापट (Raqesh Bapat) यांच्या ‘खुर्ची’ (Khurchi) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमधील डायलॉग्सनं आणि कलाकारांच्या अभिनयानं प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.


'खुर्ची'च्या जबरदस्त ट्रेलरनं वेधलं लक्ष (Khurchi Trailer Release)


खुर्ची या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात "मी राजवीर राजाराम देसाई,एक दिवस खुर्ची आपलीच असणार" या डायलॉगनं होते. त्यानंतर ट्रेलरमध्ये अक्षय वाघमारेची एन्ट्री होते. ट्रेलरमध्ये अक्षयचा "पाहिजे, पाहिजे, भिती पाहिजे." हा डायलॉग ऐकू येतो. अक्षय हा खुर्ची या चित्रपटात सम्राट ही भूमिका साकारत आहे.


‘खुर्ची’ या  बहुप्रतीक्षित चित्रपटात  राकेश बापट, अक्षय वाघमारे, आर्यन हगवणे, प्रीतम कागणे, श्रेया पासलकर, महेश घाग, कल्याणी नंदकिशोर, सुरेश विश्वकर्मा  हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


पाहा ट्रेलर:






खुर्ची या चित्रपटाचा ट्रेलर लाँच इव्हेंट नुकताच पार पडला. या इव्हेंटला चित्रपटातील कलाकारांनी हजेरी लावली. तसेच अक्षय वाघमारेच्या पत्नीनं देखील या इव्हेंटला हजेरी लावली.


कधी रिलीज होणार खुर्ची? (Khurchi Release Date)


‘खुर्ची’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट 12 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी खुर्ची या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. या टीझरनं देखील अनेकांचे लक्ष वेधले होते.


राजकारणाचे विविध रंग या चित्रपटात रेखाटण्यात आले आहेत. चित्रपटाची गाणी प्रशांत मडपुवर, सौरभ आणि सोमनाथ शिंदे यांनी लिहिली असून, त्यांना सन्मित वाघमारे, अभिषेक काटे यांनी संगीत दिले आहे. आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, अभय जोधपुरकर, रसिका वाखरकर, अमिता घुगरी आणि आर्यन यांनी  या चित्रपटातील गाणी गायली आहेत. आता ‘खुर्ची’ या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Khurchi Motion Poster Out: "सत्ता कुणाची पण असो, आता खुर्ची आपलीच!"; 'खुर्ची' चं मोशन पोस्टर रिलीज, चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला