OTT Real Life Based Series: सत्यकथेवर आधारित असणाऱ्या वेब सीरिज (Web Series) आणि चित्रपट (Movies) बघायला अनेकांना आवडतात.  नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर अनेक वेब सीरिज आणि चित्रपट रिलीज केले जातात. यांमध्ये काही वेब सीरिजमध्ये अनेकवेळा कथा अणखी रंजक करण्यासाठी सिनेमॅटिक लिबर्टीचा वापर देखील केला जातो.  ओटीटीवर (OTT) रिलीज झालेल्या क्राइम आणि सस्पेन्‍स असणाऱ्या काही सीरिजबद्दल जाणून घेऊयात...


द रेल्वे मॅन (The Railway Men)


द रेल्वे मॅन ही वेब सीरिज 1984 मध्ये झालेल्या भोपाळ गॅस गळती दुर्घटनेवर आधारित आहे. हा वेदनादायक अपघाताचा लोकांवर झालेला परिणाम या सीरिजमध्ये दाखवण्यात आला आहे. ही सीरिज Netflix या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहू शकता. या सीरिजमध्ये आर. माधवन, के.के. मेनन, बाबील खान, दिव्येंदु यांनी काम केलं आहे.


'खाकी: द बिहार चॅप्टर' (Khakee: The Bihar Chapter)


अविनाश तिवारी आणि करण टॅकर यांची 'खाकी: द बिहार चॅप्टर' ही वेब सीरिज देखील सत्य घटनेवर आधारित आहे. या सीरिजमध्ये चंदन महतोची कथा दाखवण्यात आली आहे. तुम्ही ही वेब सीरिज Netflix वर पाहू शकता.


इंडियन प्रीडेटर- द बुचर ऑफ दिल्ली  ( Indian Predator: The Butcher Of Delhi)


इंडियन प्रीडेटर- द बुचर ऑफ दिल्ली ही वेब सीरिज चंद्रकांत झा नावाच्या सीरियल किलरवर आधारित आहे. ही सीरिज देखील तुम्ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. जर तुम्हाला क्राइम आणि सस्पेन्स कंटेन्ट असणाऱ्या सीरिज आवडत असतील. तर ही सीरिज तुम्ही या वीकेंडला पाहू शकता.


ऑटो शंकर (Auto Shankar)


ऑटो शंकर ही एक क्राईम सिरीज आहे. ही सीरिज ट्विस्ट आणि सस्पेन्सने भरलेली आहे. तुम्ही हे Netflix वर देखील पाहू शकता.


मर्डर इन द कोर्टरूम (Indian Predator: Murder in a Courtroom)


मर्डर इन द कोर्टरूम ही वेब डॉक्युमेंट्री सिरीजही सस्पेन्सने भरलेली आहे. न्यायालयात अनेक स्त्रिया एका पुरुषाची हत्या कशी करतात? हे या सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे. तुम्ही ही सीरिज Netflix या ओटीटी प्लॅटफॉर्मवर  पाहू शकता.


महत्वाच्या बातम्या :  


Popular Documentries on OTT: "द हंट फॉर वीरप्पन" ते "इंडियन प्रीडेटर"; वीकेंडला पाहा शेवटपर्यंत उत्सुकता ताणून धरणाऱ्या ओटीटीवरील 'या' डॉक्युमेंट्री