Khatija Rahman Reception Video : दिग्गज संगीतकार ए.आर. रहमान (AR Rahman) यांची मुलगी खतीजा रहमान (Khatija Rahman) हिचा निकाह 5 मे रोजी ऑडिओ इंजिनिअर रियासद्दीनसोबत झाला. आता ए.आर. रहमान यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर खतीजाच्या निकाहच्या रिसेप्शनचा एक मॉन्टेज व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये खतीजाचे मित्र आणि कुटुंबीय तिचे अभिनंदन करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकरी तिचे तोंडभरून कौतुक करत आहेत. खतीजा नेहमी बुरखा परिधान करून असते. या निकाह सोहळ्यात देखील तिने हिजाब परिधान केला होता.


या रिसेप्शन सोहळ्यात खतीजाने लाल रंगाचा सलवार सूट परिधान केला होते. डोके दुपट्ट्याने झाकले होते आणि चेहऱ्याचा लाल मास्क घातला होता. त्याचवेळी खतिजाचा नवरा रियासद्दीन निळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये दिसत आहे. रहमान यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर कमेंट करत चाहते खतीजाच्या साधेपणाचे कौतुक करत आहेत.


पाहा व्हिडीओ :



दिग्गज संगीत दिग्दर्शक ए.आर. रहमान यांची मुलगी खतीजा रहमान हिचा गुरुवारी निकाह पार पडला. ए.आर. रहमानने स्वतः मुलीच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. खतीजाचे लग्न रियासदीन शेख मोहम्मद यांच्याशी झाले आहे. रहमानचा जावई रियान हा व्यवसायाने ऑडिओ इंजिनिअर आहे. इंस्टाग्रामवर लग्नाचा फोटो शेअर करताना एआर रहमानने लिहिले, ‘अल्लाह नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देवो, तुमच्या सर्व शुभेच्छा आणि प्रेमासाठी धन्यवाद." रहमानने शेअर केलेल्या फोटोमध्ये रेहमानची पत्नी सायरा बानो, त्यांची मुले आमेन आणि रहीमा देखील दिसत आहेत. या फोटोत रहमानच्या आईचा फोटोही दिसत आहे.


पाहा फोटो :



कोण आहे खतीजाचा नवरा रियासद्दीन?


खतीजा आणि रियासद्दीन यांची डिसेंबर 2021मध्ये एंगेजमेंट झाली होती. रियासद्दीन हा व्यवसायाने साऊंड इंजिनीअर आहे. विशेष म्हणजे तो दीर्घकाळापासून संगीतकार ए.आर. रहमान यांच्यासोबत काम करत आहे. त्याचबरोबर खतीजा ही गायिका आहे.