एक्स्प्लोर

Maharashtra Shahir: ‘महाराष्ट्र शाहीर’ च्या चित्रीकरणाला वाई येथे सुरुवात; केदार शिंदेनं व्यक्त केल्या भावना

शाहिरांचे मूळ गाव असलेल्या सातारा जिल्ह्यातील वाई येथे या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली.

Maharashtra Shahir: ‘महाराष्ट्राचे शाहीर’ (Maharashtra Shahir) म्हणून ज्यांची ख्याती होती त्या शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तयार  होत असलेल्या त्यांच्या जीवनावरील ‘महारष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या प्रत्यक्ष चित्रीकरणाला दसऱ्याच्या मुहूर्तावर बुधवारी 5 ऑक्टोबर रोजी सुरुवात झाली. शाहिरांचे मूळ गाव असलेल्या सातारा जिल्ह्यातील वाई येथे या चित्रीकरणाला सुरुवात झाली. चित्रपट 28 एप्रिल 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

उभ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिलेल्या ‘महारष्ट्र शाहीर’च्या चित्रीकरणाच्या शुभारंभाला चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया व बेला केदार शिंदे यांच्याबरोबर चित्रपटाचा संपूर्ण चमू उपस्थित  होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे करत असून संगीत आघाडीची संगीतकार जोडी अजय-अतुल यांचे आहे. चित्रपटात अंकुश चौधरी, सना शिंदे यांच्या प्रमुख भूमिका असून चित्रपटाचे लेखन ज्येष्ठ लेखिका व दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांचे आहे. हे सार्वजण यावेळी उपस्थित होते. 

‘महाराष्ट्र शाहीर’ची प्रस्तुती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट आणि केदार शिंदे प्रॉडक्शन्सची आहे. चित्रपटात शाहिरांच्या इतर समकालीन आणि महत्त्वाच्या व्यक्तिरेखा कोण साकारणार अशा प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काही दिवसांत टप्प्याटप्प्याने पुढे येतील.

चित्रपटाबद्दल एकेक विलक्षण गोष्टी पुढे आल्या आणि चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली. या चित्रपटातील छोट्या शाहीर साबळेना आवाज देण्यासाठी निर्माते, संगीतकारांनी चक्क समाज माध्यमांवर ‘चंद्रा’ गाण्याने लोकप्रिय झालेल्या जयेश खरेला करारबद्ध केले आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आजोबांवरील चित्रपटाचे दिग्दर्शन नातू करतो आहे, हे चित्रपटसृष्टीतील कदाचित पहिलेच उदाहरण असेल. त्यानंतर आणखी एक विक्रम या चित्रपटाने प्रस्थापित केला आहे आणि तो म्हणजे शाहिरांच्या पत्नीच्या भूमिकेत शाहिरांची पणती म्हणजे केदारची मुलगी सना दिसणार आहे. 

चित्रपटाच्या चित्रीकरण शुभारंभाबद्दल बोलताना केदार शिंदे म्हणतो,  “माझे आजोबा म्हणजे शाहिर साबळे यांच्या जीवनावरील चित्रपट ही आमच्यासाठी एक ऐतिहासिक घटना आहे. त्यात माझे योगदान मला देता येत असल्याचा मला मनस्वी आनंद आहे. त्यांच्या मार्गदर्शन आणि आशीर्वादात मी घडलो आहे. माझ्या आयुष्यावर त्यांची छाप आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होत असल्याचा आजचा दिवस सुर्वणाक्षरांनी लिहून ठेवावा असाच आहे. मला त्याबद्दल अतिशय आनंद होतोय, अभिमान वाटतोय. नातू म्हणून मला शाहीर मोठे वाटतातच, पण एक कलाकार म्हणूनही मला त्यांचे जीवन खूपच मोठे वाटते. शाहिरांचा जीवनपटावरील काम गेली अडीच वर्षे सुरू आहे. आपले कलाकार किती मोठे होते, आपल्या मातीतून हे कलाकार कसे घडले, त्यांनी यश कसे मिळवले, यश मिळवणे एवढे सोपे असते का, अशा अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे नव्या पिढीला या चित्रपटाच्या माध्यमातून मिळतील.”

‘महाराष्ट्राचे शाहीर’ अशी ज्यांची ख्याती होती त्या शाहीर साबळे यांचे जन्मशताब्दी वर्ष 3 सप्टेंबर 2022 ते 3 सप्टेंबर 2023 दरम्यान साजरे होत आहे. शाहिरांच्या जीवनावरील हा जीवनपट 28 एप्रिल 2023 मध्ये प्रदर्शित होत आहे.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Maharashtra Shahir : केदार शिंदेंच्या लेकीचं अभिनय विश्वात पदार्पण, ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात साकारणार महत्त्वाची भूमिका!

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Embed widget