Sunil Grover In Sunflower Web Series :  छोट्या पडद्यावरील कॉमेडीचा बादशाह सुनील ग्रोव्हर (Sunil Grover) आता पुन्हा एकदा ओटीटीवर झळकणार आहे. 'सनफ्लॉवर' या वेबसीरीजचा पुढील भाग 'सनफ्लॉवर-2' चा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. डार्क ह्युमर पठडीतील ही वेब सीरीज ओटीटीवर पुन्हा धुमाकूळ घालण्यास सज्ज झाली आहे. 


कॉमेडी करणारा सुनील ग्रोव्हर किलरच्या भूमिकेत?


सनफ्लॉवर-2 चा ट्रेलर लाँच करण्यात आला. हा ट्रेलर प्रेक्षकांना भावला आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सनफ्लॉवरच्या पहिल्या सीझनमध्ये  करण ग्रोव्हरने साकारलेल्या सोनू सिंहच्या व्यक्तिरेखेला लोकांची चांगलीच पसंती मिळाली होती. काहीसा वेंधळा, निरागस असणाऱ्या सोनू सिंहच्या सोसायटीत राहणाऱ्याचा संशयास्पद मृत्यू होतो. ही हत्या असल्याचे पोलिसांचे म्हणणे असते. त्यादृीष्टीने पुढील तपास सुरू होतो.  सुनील ग्रोव्हरवर संशयाची सुई असते. आता सुनील ग्रोव्हर काय धमाल करणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. 


'या' अभिनेत्रीची झाली एन्ट्री


'सनफ्लॉवर-2' च्या या सीझनमध्ये नवीन अभिनेत्री दिसणार आहे. या सीझनमध्ये अदा शर्माची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे आता या मर्डर मिस्ट्री ट्वीस्ट येईल का, याकडे लक्ष लागले आहे. अदा शर्मा ही 'द केरळा स्टोरी' या चित्रपटातून चर्चेत आली होती. अदाची भूमिका या वेब सीरिजमध्ये धमाल उडवून देणारी असल्याचे ट्रेलरवरून दिसत आहे. 






कधी रिलीज होणार 'सनफ्लॉवर-2'?


सनफ्लॉवरच्या पहिल्या सीझनला लोकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. या वेब सीरिजच्या माध्यमातून  सुनील ग्रोव्हरने  ओटीटी प्लॅटफॉर्मवर  आपले पदार्पण केले होते. पहिल्या सीझननंतर प्रेक्षकांना दुसऱ्या सीझनची प्रतीक्षा होती. आता प्रतीक्षा संपली असून 'सनफ्लॉवर-2' ही वेब सीरिज 1 मार्च रोजी  झी 5 (Zee5) वर लाँच होणार आहे. या मालिकेत सुनील ग्रोव्हर, रणवीर शौरी, गिरीश कुलकर्णी, आशिष विद्यार्थी आणि अदा शर्मा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.