Ponniyin Selvan : 'पोन्नियिन सेल्वन' (Ponniyin Selvan) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे पोस्टर आऊट झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. टीझरदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. आता या सिनेमातील 'कावेरी से मिलने' (Kaveri Se Milne) हे पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
'पोन्नियिन सेल्वन' हा एक ऐतिहासिक सिनेमा आहे. 'पोन्नियिन सेल्वन' म्हणजेच PS-1 या सिनेमातील 'कावेरी से मिलने' हे गाणं टिप्स ऑफिशयल या युट्यूब चॅनलवर रिलीज करण्यात आले आहे. ए आर रहमान, स्वागत राठोड आणि पूजा तिवारीने गायलेलं हे गाणं महबूबने लिहिलं आहे. तर ए आर रहमान यांनीच हे गाणं संगीतबद्ध केलं आहे.
'कावेरी से मिलने' हे गाणं अल्पावधीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. 'पोन्नियिन सेल्वन' हा सिनेमा 30 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, जयम रवी, कार्थी, तृषा, ऐश्वर्या लक्ष्मी, शोभिता धूलिपाला, प्रभू, आर सरथकुमार, विक्रम प्रभू, जयराम, प्रकाश राज, रहमान आणि आर पार्थिबन मुख्य भूमिकेत आहेत.
दोन भागांत रिलीज होणार 'पोन्नियिन सेल्वन'
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक मणिरत्नम 'पोन्नियिन सेल्वन' या सिनेमाच्या माध्यमातून चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. 'पोन्नियिन सेल्वन' हा सिनेमा दोन भागांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. हा सिनेमा कल्कि यांच्या तमिळ कादंबरीवर आधारित असणार आहे. ही कादंबरी 1995 साली काल्कि यांनी लिहिली आहे. लाइका प्रोडक्शन आणि मद्रास टॉकीजच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या