Bollywood Movies Box Office Collection : हिंदी सिनेसृष्टीसाठी 2024 खूपच खास असणार आहे. विविध धाटणीचे दर्जेदार सिनेमे वर्षाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विजय सेतुपती (Vijay Sethupathi) अभिनीत 'मेरी ख्रिसमस' (Merry Christmas) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर दुसरीकडे तेजा सज्जाचा (Teja Sajja) 'हनुमान' (Hanuman) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहेत.
कतरिना-विजयच्या 'मेरी ख्रिसमस'च्या कमाईत घसरण
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांच्या 'मेरी ख्रिसमस' या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. अखेर 12 जानेवारी 2024 रोजी हा सिनेमा रिलीज करण्यात आला. प्रेक्षकांचा या सिनेमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पण बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये वाढ झालेली मात्र पाहायला मिळत नाही.
'मेरी ख्रिसमस' या सिनेमाची निर्मिती 60 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी 'मेरी ख्रिसमस'ने 2.45 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 3.45 कोटी, तिसऱ्या दिवशी 3.83 कोटी, चौथ्या दिवशी 1.65 कोटी आणि पाचव्या दिवशी 1.3 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत आतापर्यंत 'मेरी ख्रिसमस'ने 20 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. श्रीराम राघवन दिग्दर्शित 'मेरी ख्रिसमस' हा मर्डर मिस्ट्री सिनेमा आहे. या सिनेमात कतरिना-विजयसह संजय कपूर, टीनू आनंद, विनय पाठक हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
तेजा सज्जाच्या 'हनुमान'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या.. (Hanuman Box Office Collection)
तेजा सज्जा स्टार 'हनुमान' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. प्रशांत वर्मा यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. वेगळ्या धाटणीच्या या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, 'हनुमान' या सिनेमाने ओपनिंग डेला 8.5 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 12.45 कोटी, तिसऱ्या दिवशी 16 कोटी, चौथ्या दिवशी 3.75 कोटी, पाचव्या दिवशी 13.11 कोटी, सहाव्या दिवशी 11.50 कोटींची कमाई केली. एकंदरीत आतापर्यंत या सिनेमाने 80.46 कोटींचा गल्ला जमवला आहे. लवकरच हा सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल.
'हनुमान' हा सिनेमा तेलुगू, हिंदी, मराठी, तामिळ, कन्नड, मल्याळम, इंग्रजी, स्पॅनिश, कोरियाई, चीनी आणि जपानी, अशा 11 भाषांमध्ये रिलीज झाला आहे. 25 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. तेजा सज्जा, अमृता अय्यर, वरलक्ष्मी आणि विनय राय हे कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
संबंधित बातम्या