Adah Sharma: 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या चित्रपटामुळे अभिनेत्री अदा शर्माला (Adah Sharma) विशेष लोकप्रियता मिळाली. अदा ही केवळ तिच्या अभिनयानच नाही तर तिच्या अनोख्या फॅशन स्टाईलमुळे देखील  चर्चेत असते.  नुकतीच  अदाने मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. यावेळी अदानं पांढरा कुर्ता आणि स्काय ब्लू पॅन्ट असा लूक केला होता. पण तिच्या लूकपेक्षा तिच्या चप्पलनं अनेकांचे लक्ष वेधलं.


अदाच्या चप्पलनं वेधलं साऱ्यांचे लक्ष!


अदा शर्मा ही विमानतळावर  फंकी हिरव्या ग्रास चप्पल घालून आली होती. एअरपोर्टवरुन अदाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे पाहून नेटकऱ्यांनी इको-फ्रेंडली फॅशनला प्रोत्साहन दिल्याबद्दल अदाचं कौतुक केले आहे.


काय आहे खास?


ग्रास चप्पलमध्ये गवत असते. ज्यामुळे ही चप्पल घातल्यानंतर गवतावर चालल्यासारखा भास होतो. कुठल्याही ऑनलाइन शॉपिंग वेब साइटवर तुम्हाला ग्रास चप्पल मिळेल.  200 रुपयांपासून ते 600 रुपयांपर्यंत किंमत असणाऱ्या ग्रास चप्पल तुम्हाला ऑनलाइन शॉपिंग वेब साइटवर दिसतील.


अदा शर्माच्या एअरपोर्टवरील व्हायरल व्हिडीओवर एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "तुझ्या नॅचरल लूक आणि प्राणी प्रेमामुळे  तू सगळ्यांपेक्षा वेगळी आहेस" तर अनेकांनी अदा शर्माच्या ग्रास चप्पलचं कौतुक केलं आहे.


पाहा व्हिडीओ:






अदाच्या 'द केरळ स्टोरी' चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.


'द केरळ स्टोरी' या चित्रपटामधील अदाच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. या चित्रपटात अदा शर्मासोबतच  योगिता बिहानी, सोनिया बलानी आणि सिद्धी इडनानी यांनी देखील प्रमुख बूमिका साकारली.  या चित्रपटाचं दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केलं आहे.


अदाचे चित्रपट


 2008 मध्‍ये रिलीज झालेल्या विक्रम भट्टच्‍या 1920 या  हॉरर  चित्रपटामधून अदानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अदानं कमांडो 2, कमांडो 3 आणि बायपास रोडसह अनेक चित्रपटांमध्ये काम केले. आता अदाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Adah Sharma: अदा शर्मा नाही तर 'हे' खरं नाव; 'द केरळ स्टोरी' मधील अभिनेत्रीनं सांगितलं नाव बदलण्याचं कारण