Katrina Kaif And Vicky kaushal Wedding : अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांची रेशीमगाठ जुळण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. कतरिना आणि विकीचा राजस्थानमध्ये आज शाही विवाह होणार आहे. गेल्या महिन्याभरापासून यांच्या लग्नाच्या चर्चांना सोशल मीडियावर व्हायरल आहेत. 


राजस्थानमधील सवाई माधोपूरमध्ये यांचा शाही विवाह पार पडणार आहे. यांच्या लग्नाबाबत अनेक बातम्या सातत्याने ऐकायला मिळत आहेत. लग्नाला येणार्‍या पाहुण्यांना मोबाईल फोन वापरण्यास बंदी असेल, तसेच या लग्नाला येण्यासाठी पाहुण्यांना खास निमंत्रण कोड देण्यात येणार आहे. या सिक्रेट वेडींगचं कारण तुम्हांला माहीत आहे का? मीडिया रिपोर्टनुसार, विकी कौशल आणि कतरिना त्यांच्या लग्नाचे फोटो विकणार आहेत, त्यामुळेच त्यांच्या लग्नात प्रचंड सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.  याआधी प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा, प्रिती झिंटा यांनीही त्यांच्या लग्नाचे फोटो विकले आहेत.


मीडिया रिपोर्टनुसार, कतरिना आणि विकीच्या लग्नाच्या ठिकाणी कॅमेरा आणि मोबाईल वापरावर बंदी घालण्यात आली आहे. लग्नाची जबाबदारी पार पाडणाऱ्या एजेन्सीनं फोटो अथवा व्हिडीओ लीक होऊ नये, याची पूर्ण काळजी घेतली आहे. एका रिपोर्टनुसार, विकी-कतरिनाच्या लग्नातील फुटेजसाठी एका ओटीटीनं मोठी ऑफर दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ अॅमेझॉन प्राईम व्हिडिओला 80 कोटी रुपयांना विकण्याचा निर्णय घेतला आहे. 


कतरिना आणि विकी आधी या सेलिब्रिटींनीही विकले लग्नाचे फोटो
प्रियांका चोप्रा-निक जोनास (Priyanka Chopra-Nick Jonas) : 2018 साली प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचे लग्न झाले. मीडिया रिपोर्टनुसार, यांनी एका इंटरनॅशनल मॅगझिनला लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ 18 कोटी रुपयांना विकले. 




अनुष्का शर्मा-विराट कोहली (Anushka Sharma-Virat Kohli) : अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओही एका आंतरराष्ट्रीय मासिकाला करोडोंमध्ये विकले गेले. हे पैसे या जोडप्याने चॅरिटीमध्ये खर्च केल्याचे मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात येत आहे.




प्रीती झिंटा-जीन गुडइनफ (Preity Zinta-Gene Goodenough) : अभिनेत्री प्रीती झिंटाने 2016 साली आर्थिक विश्लेषक जीन गुडइनफशी लग्न केले. मीडिया रिपोर्टनुसार, लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ करोडो रुपयांना विकले गेले आणि यातून मिळालेले पैसे एका चॅरिटी फाउंडेशनला देण्यात आले.





इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha