Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घरात आता पुन्हा एकदा उत्साहाचं वातावरण निर्माण झाल्याचं पहायला मिळालं आहे. कारण या आधी घरातून बाहेर पडलेल्या काही सदस्यांची पुन्हा घरवापसी झाली आहे. हे सदस्य म्हणजे स्नेहा वाघ, आदेश वैद्य आणि तृप्ती देसाई आहेत. हे सदस्य घरात पुन्हा येताच या तिघांचा धूमाकूळ प्रेक्षकांना पाहायला मिळाला. सोशल मीडियावरही यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली आहे. 


मीरा तू एकटी नाहीस...
तृप्ती देसाई या घरात परत येताच त्यांनी मीराची कडकडून गळाभेट घेतली. आता तू एकटी नाहीस, मी आली आहे..’ असं त्या मीराला उद्देशून म्हणाल्या. यावरून नेटकरी अंदाज वर्तवत आहे की, मीरा आणि गायत्रीमध्ये झालेल्या भांडणामुळे मीरा एकटी पडली होती त्यामुळे आता तृप्ती देसाई मीराच्या बाजूने खेळतील. 


स्नेहाचा विश्वासघात कोणी केला? 
त्यानंतर स्नेहा वाघची एन्ट्री होताच स्नेहा वाघने तर तिच्या मित्रांवरच फायरिंग करायला सुरुवात केली. स्नेहा वाघ घराच्या बाहेर पडण्याआधी जय दुधाणेची आणि तिची मैत्री खूप घट्ट पाहायला मिळत होती. परंतु घरात पुन्हा येताच प्रेक्षकांना एक वेगळा शॉक बसला आहे. ‘सगळं गेमसाठी होतं ना? तू माझा विश्वासघात केलाय..’ असं म्हणत स्नेहाने जयला खडेबोल सुनावले. तर बिग बॉसच्या घरात जय दुधाणेची शत्रू असलेली मिनल शहाचं स्नेहानं कौतुकही केलं. 


यावरून प्रेक्षकांची बिग बॉस पाहण्याची उत्सुकता वाढली आहे. मिनल शहाचा गेम हा नेटकऱ्यांना भावतोय तर प्रत्येक एपिसोडला मिनल शहाचं कौतुकही प्रेक्षकांकडून होत आहे. हिंदी रोडीजमधून आलेली मिनल शहाने मराठी बिग बॉसमध्ये येऊन टास्क उत्तम खेळत मराठमोळ्यांची मनं जिंकली आहेत. आता फक्त 20 दिवसांचा हा प्रवास राहिला आहे. खरी मजा आता येणार आहे की, कोण या ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल करणार?


संबंधित बातम्या :