Traffic Police Stopped Katrina Kaif Car Watch Video : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशलचे (Vicky Kaushal) लग्न सध्या बी-टाऊनमधील चर्चेचा विषय आहे. विकी आणि कतरिनाचे लग्न दोन दिवसांवर आले असले तरी अद्याप दोघांकडून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. विकी आणि कॅटवर चाहते सध्या नजर ठेऊन आहेत. दरम्यान कतरिनाची गाडी वाहतूक पोलिसांनी तपासणीसाठी थांबवली आहे.
कतरिनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ट्रफिक पोलिस तिची कार थांबवताना दिसत आहेत. त्यानंतर ते ड्रायव्हरच्या सीटजवळ येताना खिडकीतून आत डोकावतात. व्हिडिओमध्ये विशेष काही दिसत नसले तरी कतरिनाच्या लग्नाच्या चर्चेदरम्यान वाहतूक पोलिसांची होणारी धावपळ पाहूण चाहत्यांना मजा येत आहे.
कतरिनाच्या या व्हिडीओवर तिचे चाहते कमेंट्स करत आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे,"कतरिनाला भेटण्याची खूप इच्छा होती. दुसऱ्याच दिवशी भेटण्याचा योग आला". एका चाहत्याने तर लग्नाची अधिकृत घोषणा करण्याची विनंती केली आहे. एकाने लिहिले आहे,"दोघे लग्न करणार आहेत की नाही हे एकदा बघा. मला काहीतरी गडबड वाटत आहे."
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha