The Omicron Variant Film Poster : ओमायक्रॉन हा कोरोनाचा नवा व्हेरियंट सध्या पूर्ण जगभरात चर्चेचा विषय झाला आहे. या व्हेरियंटमुळे जगभरात अनेक नियम पाळले जात आहेत. या व्हेरियंटचे नावं कदाचित प्रत्येकानेच पहिल्यांदाच ऐकले असेल. पण  'द  ओमायक्रॉन व्हेरियंट' नावाचा एक चित्रपट 1963 मध्ये प्रदर्शित झाला होता, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. या चित्रपटाचा पोस्टर देखील प्रचंड व्हायरल होतोय. पण खरंच हा चित्रपट प्रदर्शित झाला होता का? तसेच या चित्रपटाचे हे पोस्टर खरे आहे का? असे प्रश्न नेटकऱ्यांच्या मनात नक्कीच पडले असतील. तर असा कोणताही सिनेमा प्रदर्शित झालेला नसून ही फेकन्यूज आहे. 



प्रसिद्ध चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मा यांनी ट्विटरवर,  'द  ओमायक्रॉन व्हेरियंट' या चित्रपटाचा पोस्टर शेअर केले. हे पोस्टर शेअर करून त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, 'विश्वास ठेवा किंवा नका ठेवू .. हा चित्रपट 1963 मध्ये आला होता .. चित्रपटाची टॅगलाइन पहा.' या पोस्टरमध्ये चित्रपटाची टॅगलाइन ही,' ज्या दिवशी पृथ्वीचे रूपांतर स्मशानात झाले होते. ' अशी लिहिलेली आहे. सध्या हा पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 






'द  ओमायक्रॉन व्हेरियंट' या चित्रपटाचे व्हायरल झालेले पोस्टर हे फेक आहे. खरंतर हे पोस्टर 1974 मध्ये प्रदर्शित झालेल्या  'Phase IV' या चित्रपटाचे आहे.  'Phase IV' या चित्रपटाचे पोस्टर एडिट करून 'द  ओमायक्रॉन व्हेरियंट'  या चित्रपटाचा पोस्टर तयार करण्यात आले आहे. 


संबंधित बातम्या


Bigg Boss 15 : Rakhi Sawant आणि Abhijit Bichukale चा 'बिग बॉस'मध्ये दिसणार जलवा


Vicky - Katrina Wedding : आली समीप लग्नघटीका, विकी कौशल-कतरिना कैफच्या लग्नाची लगीनघाई सुरू