मुंबई : अभिनेता सोनू सूदला (sonu sood) मुंबई महानगर पालिकेने (BMC) पुन्हा नव्याने नोटीस पाटविली आहे. सोसू सूदच्या सहा मजली इमारतीमधील हॉटेलचे निवासी इमारतीमध्ये रूपांतरीत न केल्यामुळे त्याला ही नवी नोटीस पाठविण्यात आली आहे.
जुलै महिन्यात मुंबई महापालिकेने सोनू सूदला जुहूमधील आपल्या मालकीच्या शक्तिसागर या निवासी इमारतीत हॉटेलचे अनधिकृत बांधकाम केल्याबद्दल नोटीस पाठवली होती. त्यामध्ये त्याने या हॉटेलचे निवासी इमारतीत रूपांतर करावे आणि इमारतीमध्ये केलेले बेकायदा बांधकाम हटवावे असे सांगितले होते. त्यावर सोसू सूदने पालिकेला सांगितले होते की, हॉटेलच्या बांधकामात बदल करून घेईन. परंतु, त्याच्याकडून त्यामध्ये कोणतेही बदल न केल्याची बाब समोर आल्यानंतर पालिकेने आता त्याला नवीन नोटीस पाठविली आहे.
पुढील सात दिवसांच्या आत त्याने हॉटेलचे निवासी इमारतीत रूपांतर करावे अन्यथा कोणतीही सूचना न देता कारवाई केली जाईल. असा इशारा पालिकेने सोनू सूदला दिला आहे.
नव्याने पाठविलेल्या नोटीसीमध्ये पालिकेने म्हटले आहे की, "आपण पालिकेला पाठविलेल्या उत्तरात एक ते सहा मजल्यावरील लॉजिंग आणि बोर्डिंग उभारण्याचे काम बंद करून पालिकेने दिलेल्या आराखड्यानुसार बांधकाम केले जाईल. त्याचे कामही प्रगतीपथावर असल्याचे नमूद केले होते. परंतु, 20 ऑक्टोंबर रोजी पालिकेने केलेल्या पाहणीत बांधकामात कोणत्याही प्रकारचे बदल केले नसल्याचे पाहायला मिळाले.
परंतु, सोनू सूद याने एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, शक्तीसागर मधील हॉटलचे निवासी इमारतीत रूपांतर केले असून त्याची माहिती महापालिकेला दिली आहे. त्याबाबच्या कागदपत्रांची पुर्तता करण्याचे काम सुरू आहे. पालिकेने दिलेल्या परवानगीनुसारच बांधकाम राहिल.
बेकायदेशीर बांधकामाची लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केलेले सामाजिक कार्यकर्ते गणेश कुसमुलू म्हणाले की, पोलिसांनी सूद याच्या विरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे. शक्तीसागरमधील इमारतीचे मुलींच्या वसतिगृहात रूपांतर झाले आहे. लोकायुक्तांच्या आदेशानंतरही महापालिका बेकायदेशीर बांधकाम पाडण्याची कारवाई करत नाही तर फक्त नोटीसी पाठवत आहे.
काय आहे प्रकरण?
सोनूने जुहू येथील 'शक्ती सागर' या निवासी इमारतीत बेकायदेशीरपणे हॉटेल सुरू केल्याबद्दल पालिकेच्या 'के पश्चिम' विभाग कार्यालयाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार गेल्यावर्षी 24 ऑक्टोबरला पालिकेच्या पथकाकडून तिथली पाहणीही करण्यात आली होती. त्यावेळी तिथं मंजूर झालेल्या आराखड्यानुसार जागेचा वापर करण्यात आला नसून इमारत बांधकामात अनधिकृतपणे काही बदल केले असल्याचा ठपका सोनू सूदवर ठेवण्यात आला.
संबंधित बातम्या
Sonu Sood : सोनू सूदच्या अडचणी वाढणार, 20 कोटींच्या टॅक्स चोरीचा आरोप, आयकर विभागानं दिली माहिती
Sonu Sood : दोन पक्षांनी दिलेली खासदारकीची ऑफर नाकारली; टॅक्स चोरीच्या आरोपावर सोनू सूदने सोडलं मौन