Katrina Kaif Valentine plans : अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल नुकतेच विवाह बंधनात अकडके आहे. परंतु,लग्न झाल्यापासून हे कपल एकमेकांपासून वेगळे झाले आहे. कधी विकी त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असतो तर कधी कतरिना तिच्या शूटमध्ये. लग्नानंतर या दोघांनी खूप कमी वेळ एकत्र घालवला आहे. अशा परिस्थितीत व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने दोघांमधील हे अंतर संपुष्टात येईल असे चाहत्यांना वाट आहे. 


व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने विकी आणि कतरिना एकत्र यावेत असे चाहत्यांना वाटत असले तरी याच्या उलटंच घडलं आहे. कारण यावेळी मिसेस कौशल लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन पती विकी कौशलसोबत नाही तर मित्र सलमान खानसोबत साजरा करणार आहे.  


कतरिना कैफ सलमान खानसोबत टायगर 3 मध्ये दिसणार आहे. येत्या शनिवारपासून टायगर 3 च्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. 5 फेब्रुवारीपासून हा चित्रपट दिल्ली'मध्ये शूट होणार आहे. त्यामुळे कतरिना कैफ या शूटमध्ये सलमान खानसोबत दिल्लीला जाणार आहे.


टायगर 3 चे शूटिंग लवकरात लवकर पूर्ण करण्याचा या चित्रपटाचे निर्माते प्रयत्न करत आहेत. पण टायगर 3 च्या शूटिंगमुळे कतरिनाला तिचा व्हॅलेंटाईन विकीपासून दूर एकट्याने साजरा करावा लागणार आहे. असे असले तरी विकी त्याच्या प्रेमासोबत व्हॅलेंटाईन साजरा करण्यासाठी दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.  


रशिया, तुर्की, ऑस्ट्रिया आणि मुंबईत शूट झालेला 'टायगर 3' हा यशराज फिल्म्सचा बिग बजेट सिनेमा आहे.  सिनेमात काही चित्तथरारक अॅक्शन सीक्वेन्सदेखील आहेत. 'टायगर 3' सिनेमात सलमान खान आणि कतरिना कैफसोबत इमरान खानदेखील मुख्य भूमिकेत आहे. सिनेमात जोया हुमानी हे पात्र कतरिना साकारणार आहे. 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है' नंतर प्रेक्षक आता 'टायगर 3' सिनेमाची प्रतिक्षा करत आहेत. टायगर सिनेमाच्या तिसऱ्या भागात अविनाश सिंह राठौरचे पात्र सलमान खान  साकारणार आहे. 


मत्वाच्या बातम्या