Anant-Radhika Pre-Wedding: जामनगरमध्ये अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंटच्या (Radhika Marchant) प्री वेडिंग सोहळ्याला जवळपास संपूर्ण बॉलिवूड जमलं होतं. बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांपासून ते त्यांच्या लेकरांपर्यंत सर्वांनी या सोहळ्यासाठी हजेरी लावली. पण या सोहळ्यातून काही मंडळी मात्र गायबच असल्याचं पाहायला मिळालं. या सोहळ्यात हृतिक रोशन (Hritik Roshan), अनुष्का शर्मा (Anushka Sharma), शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty), प्रियांका चोप्रा (Priyanka Chora), कंगना राणौत (Kangana Ranaut) हे कलाकार दिसले नाही. हे कलाकार या सोहळ्याला का आले नव्हते की त्यांना आमंत्रित करण्यात आलं नव्हतं, असे प्रश्न सध्या त्यांच्या चाहत्यांना पडले आहेत. 


जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. तीन दिवस चाललेल्या या सोहळ्यात सेलिब्रेटींनी रॉयल्टीप्रमाणे वेषभूषा केली आणि रिहाना, एकॉन, अरिजित सिंग, दिलजीत दोसांझ आणि श्रेया घोषाल यांच्या सुरांवर नृत्य केले. मात्र, या सोहळ्यातून काही मोठी नावे गायब होती. 


'या' सोहळ्यातून का गायब होते हे कलाकार


प्री-वेडिंगच्या काही दिवस आधी, हृतिक रोशनने क्रॅचच्या मदतीने एक फोटो शेअर केला होता. यामध्ये हृतिकला दुखापत झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे हृतिक या सोहळ्याला उपस्थित राहू शकला नाही, असं सांगण्यात येत आहे. दरम्यान प्रियांका चोप्राही या सोहळ्याला उपस्थित नव्हती. पण तिच्या अनुपस्थितीचे कारण अद्यापही समोर आलेले नाही. पण या सोहळ्याला तिची आई मधु चोप्रा या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. 


मागील महिन्यात अनुष्का आणि विराटने त्यांच्या दुसऱ्या मुलाचे स्वागत केले. सध्या अनुष्का आणि विराट हे लंडनमध्ये आहेत. त्यामुळे हे दोघेही अनंत आणि राधिकाच्या प्री वेडिंग सोहळ्यासाठी हजर राहू शकले नाही. या सोहळ्यात काजोलही दिसली नाही. पण  अजय देवगण आणि त्याची  मुलगी न्यासा या सोहळ्यासाठी उपस्थित होते.  या सेलिब्रेशनमध्ये देओल कुटुंबातील एकही सदस्य उपस्थित नव्हता. तसेच या सोहळ्यासाठी शिल्पा शेट्टी देखील दिसली नाही. याचसोबत कंगना राणौत एकही दिवस दिसली नाही. या लोकांच्या गैरहजेरीमुळे यातील काहींना आमंत्रित करण्यात आले नसल्याचं सांगण्यात येत आहे. 


अंबानींच्या सोहळ्याला बॉलिवूडकरांची धम्माल


या सोहळ्यासाठी जे बॉलिवूड कलाकार उपस्थित होते, त्यांनी यामध्ये बरीच धम्माल केली.  सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान या तिघांनी एकत्र केलेला डान्स विशेष गाजला. अंबानी कुटुंबातील सदस्यांनीही कार्यक्रमात परफॉर्म केले. मेटा सीईओ मार्क झुकेरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी आणि सल्लागार इवांका ट्रम्प यांनीही या सोहळ्यासाठी हजेरी लावली होती. 


ही बातमी वाचा : 


Katrina Kaif and Vicky Kaushal : दीपिकानंतर कतरिना आणि विक्कीकडेही गुडन्यूज? अनंत-राधिकाच्या प्री वेडिंगमधला व्हिडिओ व्हायरल