Katrina Kaif Vicky Kaushal Video Viral : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) सध्या आपल्या प्रेग्नंसीच्या चर्चांमुळे चर्चेत आहे. कतरिना काही दिवसांपासून लंडनमध्ये आहे. कतरिनाला भेटायला तिचा पती विकी कौशल लंडनमध्ये येऊन जाऊन असतो. अशातच आता कतरिनाच्या प्रेग्नंसीच्या चर्चांनी सोशल मीडियावर जोर धरला आहे. परदेशातील कतरिना कैफ आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये कतरिनाने काळ्या रंगाचा ओव्हरसाइज कोट परिधान केलेला पाहायला मिळत आहे. तर विकी कौशल काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे.


कतरिना-विकीचा व्हिडीओ व्हायरल (Katrina Kaif Vicky Kaushal Viral Video)


कतरिना कैफ आणि विकी कौशल लंडनच्या गल्ल्या फिरुन रस्ता ओलांडताना दिसत आहेत. त्यावेळी कोणीतरी आपला व्हिडीओ बनवत असल्याचा भास कतरिनाला झाला.  त्यानंतर कतरिना विकीचा हात खेचते. व्हिडीओ बनवत असल्याने कतरिनाला प्रचंड राग आलेला आहे. कतरिनाचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर ती प्रेग्नंट असल्याचं लोक म्हणत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे,"व्हिडीओमध्ये कतरिनाचे बेबी बंप दिसून येत आहेत".






कतरिना कैफने विकी कौशलच्या वाढदिवशी अभिनेत्याचे काही न पाहिलेले फोटो शेअर केले होते. फोटो शेअर करण्यासोबत तिने कॅप्शनमध्ये तीन केक आणि तीन हार्ट इमोजी शेअर केले आहेत. त्यानंतर कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याचं चाहते म्हणत आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात येत आहे की, कतरिना कैफ आपली डिलीव्हरी लंडनमध्येच करणार आहे. अद्याप याबद्दल कतरिना कैफ किंवा विकी कौशलने काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 


कतरिना कैफ शेवटची विजय सेतुपतीच्या 'मेरी क्रिसमस' या चित्रपटात झळकली होती. ओटीटीवर रिलीज झालेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या चित्रपटात कतरिनाने आईची भूमिका साकारली आहे. तर दुसरीकडे विकी कौशलचे 'बॅड न्यूज' आणि 'छावा' सारखे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. कतरिनाचा आगामी 'टायगर 3' (Tiger 3) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


विकी कौशल आणि कतरिना कैफ 9 डिसेंबर 2021 रोजी लग्नबंधनात अडकले  आहेत. विकी-कतरिना राजस्थानमधील सवाई माधोपुरमध्ये लग्नबंधनात अडकले आहेत. आता लवकरच कतरिना-विकी लग्नबंधनात अडकतील. 


संबंधित बातम्या


Katrina Kaif Pregnancy News : दीपिका आधीच कतरिना होणार आई? विकीसोबतच्या व्हिडीओने चर्चांना उधाण