Katrina Kaif Pregnancy News :   बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणनंतर (Deepika Padukone) कतरिना कैफच्या (Katrina Kaif) प्रेग्नेंसीची चर्चा सुरू आहे. मात्र, कतरिना कैफ अथवा तिचा पती अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांनी त्यावर कोणतीही अधिकृत भाष्य केले नाही. कतरिना कैफही मागील अनेक दिवसांपासून पॅप्सच्या कॅमेऱ्यात कैद झाली नाही. या सगळ्या चर्चांच्या दरम्यान कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत कतरिना गरोदर असल्यासारखे दिसत आहे. त्यावरून आता कतरिना आणि विकी हे दीपीका-रणवीरच्या आधी आई-बाबा होणार असल्याचे चाहत्यांनी म्हटले आहे. दीपिका ही सप्टेंबर महिन्यात बाळाचे स्वागत करणार आहे.


काळजी घेताना दिसला विकी


कतरिना कैफ आणि विकी कौशलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ लंडनमधील असल्याचे म्हटले जात आहे.  यामध्ये कतरिना आणि विकी रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. कतरिनाने लाँग कोट घातला आहे. विकी चालताना कतरिनाची काळजी घेताना दिसत आहे. या व्हिडीओवर युजर्स, चाहत्यांकडून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. 


पाहा व्हिडीओ : 






 


कतरिना आहे प्रेग्नेंट?


या व्हिडीओवर एका युजरने कतरिना ही गरोदर असल्याचे म्हटले आहे. एकाने म्हटले की कतरिनाला आपल्या काही गोष्टी खासगी ठेवण्यास आवडतात. तर, एका युजरने म्हटले की कतरिना ही दीपिकापेक्षा अधिक प्रेग्नेंट दिसत आहे, त्यामुळे कतरिना ही लवकरच आई होईल असाही अंदाज व्यक्त केला आहे.


मतदानाच्या वेळी दीपिकाची काळजी घेताना रणवीर 


 मुंबईत 20 मे रोजी मतदान पार पडले. यावेळी आपल्या मतदानाचा हक्क  बजावण्यासाठी दीपिका आणि रणवीरने हजेरी लावली होती. त्यावेळी रणवीर तिची काळजी घेताना दिसला. समोर आलेल्या व्हिडीओत दीपिकाचा बेबी बंपही दिसला.