Katrina Kaif and Vicky Kaushal : नुकतच अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Sing) यांनी त्यांच्या घरी नवा पाहुणा येणार असल्याची गुडन्यूज दिलीये. तसेच आता कतरिना कैफ (katrina kaif) आणि विक्की कौशल (vicky kaushal) यांच्याकडे देखील गुडन्यूज असल्याच्या चर्चा आहेत. कारण अनंत-राधिकाच्या प्री वेंडिगदरम्यान कतरिना तिचे बेबी बंप लपवल्याचं स्पष्ट दिसलं. त्यामुळे आता कतरिना आणि विक्कीच्या घरीही नवा पाहुणा येणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहे. 


जामनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अनंत आणि राधिकाच्या प्री वेडिंगच्या कार्यक्रमांना विक्की आणि कतरिनाने हजेरी लावली होती. 1 मार्च ते 3 मार्च दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले होते. कतरिना आणि विक्की जेव्हा या कार्यक्रमासाठी जामनगरमध्ये पोहचले तेव्हा कॅमेऱ्यामध्ये कतरिना तिचे बेबी बंप लपवत असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता दीपिकानंतर कतरिना गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 






कतरिनाही लवकरच देणार गुडन्यूज?


दीपिकाचेही सोशल मीडियावर तिच्या एका व्हिडिओमध्ये बेबी बंप दिसले होते. त्यामुळे ती गरोदर असल्याच्या चर्चा जोरदार सुरु होत्या. त्यानंतर तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्यांच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार असल्याचं सांगितलं. आता कतरिना देखील कॅमेऱ्यामध्ये बेबी बंप लपवल्याचं पाहायला मिळत आहे. तिने गुलाबी रंगाचा अनारकली ड्रेस घातला आहे. तिचा हा लूज ड्रेस असून तिने पोटाभोवती ओढणी घेतलीये. त्यामुळे ती बेबी बंप लपवत असल्याचं म्हटलं जात आहे. 


दीपिकाने जाहीर केली गुडन्यूज


दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) लवकरच गूड न्युज देणार आहेत, अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या. बॉलीवूडमध्ये सर्वत्र चर्चेत असलेल्या बातमीला आता पूर्णविराम मिळाला आहे.  या बातम्यांवर दीपिका आणि रणवीरने शिक्कामोर्तब केला आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच आई होणार असल्याची माहिती जोडप्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे सर्वांसोबत शेअर केली आहे. दीपिका वयाच्या 37 व्या वर्षी आई होणार आहे. 


ही बातमी वाचा : 


Deepika Padukone : 'दीपवीर'च्या घरी लवकरच येणार नवा पाहुणा; रणवीरने सांगितली डिलिव्हरी डेट