Deepika Padukone : दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) लवकरच गूड न्युज देणार आहेत, अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या. बॉलीवूडमध्ये सर्वत्र चर्चेत असलेल्या बातमीला आता पूर्णविराम मिळाला आहे, या बातम्यांवर दीपिका आणि रणवीरने शिक्कामोर्तब केला आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच आई होणार असल्याची माहिती जोडप्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे सर्वांसोबत शेअर केली आहे.






बॉलिवूडच्या प्रसिद्ध जोडप्याने त्यांच्या प्रेग्नेन्सीची बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे. दीपिकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून सर्वांना ही आनंदाची बातमी दिली. यानंतर या दोघांच्या चाहत्यांना एकच आनंद झाला आहे. अनेक कलाकारांनी या जोडप्याचं अभिनंदन केलं आहे. चाहत्यांनी देखील रणवीर-दीपिकावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दीपिका वयाच्या 37 व्या वर्षी आई होणार आहे. 


सेलिब्रिटींनी केलं अभिनंदन


प्रेग्नेन्सी कन्फर्मेशन पोस्टच्या कॅप्शनमध्ये दीपिकाने जोडलेले हात आणि दुष्ट नजर रक्षा इमोजी टाकला आहे. या पोस्टवर मनीष मल्होत्रा, बिपाशा बासु, मेधा शंकर, अंगद बेदी, मियांग चांग, मसाबा गुप्ता यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी या जोडप्याचं अभिनंदन केलं आहे. चाहत्यांनीही दीपिकाचं मदर्स क्लबमध्ये येत असल्याचं स्वागत केलं आहे. 


जोडप्याने 2018 मध्ये केलं लग्न


दीपिका आणि रणवीर हे बॉलिवूडमधील पॉवर कपल्सपैकी एक आहेत. या दोघांची लव्ह स्टोरी रामलीला चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली. 2012 मध्ये त्यांनी डेटिंगला सुरुवात केली. त्यानंतर 2018 मध्ये या जोडप्याने इटलीतील लेक कोमोमध्ये डेस्टिनेशन वेडिंग उरकलं. दीपिकाचा शेवटचा रिलीज झालेला चित्रपट फायटर होता, त्याला लोकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तिचे अनेक आगामी चित्रपट देखील रांगेत आहेत, ज्यात कल्की 2898 एडी, सिंघम अगेन यांचा समावेश आहे.


काही दिवसांपूर्वी बेबी बंप लपवताना दिसली होती अभिनेत्री


गेल्या अनेक दिवसांपासून दीपिकाच्या गरोदरपणाची चर्चा होती. बाफ्टा अवॉर्ड्स 2024 (BAFTA Awards) मध्ये दीपिकाने हजेरी लावली होती, त्यावेळी दीपिकाने नेसलेल्या साडीत तिचा बेबी बंप दिसत होता. साडीमध्ये ती बेबी बंप लपवताना दिसून आली.  


सविस्तर वाचा:


Deepika Padukone Pregnant : दीपिका पादुकोण प्रेग्नंट? रणवीर सिंह लवकरच होणार बाबा; BAFTA पुरस्कार सोहळ्यात बेबी बंप लपवताना दिसली अभिनेत्री