Karwa Chauth 2021 : बॉलवूडमधील Karwa Chauth ची खास गाणी, प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात ही सुपरहिट गाणी
Karwa Chauth 2021 : बॉलिवूड चित्रपटांत करवा चौथला अधिक आकर्षण देण्यात आले आहे. करवा चौथ खास करणारी काही गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असतात.
Karwa Chauth 2021 : भारतीय सण-समारंभांना हिंदी सिनेमांत विशेष महत्त्व देण्यात आले आहे. सिनेमातील काही गाणी, प्रसंग प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहत असतात. उद्या महिलावर्ग करवा चौथ सण साजरा करणार आहेत. या सणानिमित्त महिला श्रृंगार करतात. तसेच काही न खाण्याचा आणि पिण्याचा कडक उपवास करतात. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांत करवा चौथ स्पेशल गाण्यांचा समावेश आहे. ही गाणी नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असतात.
चित्रपट - दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे
गाणं - मेहंदी लगा के रखना
या चित्रपटात काजोल, शाहरुख खानसाठी करवाचौथचा उपवास करत असते. गाण्याच्या शेवटी काजोल बेशुद्ध पडते. त्यानंतर शाहरुख तिला पाणी देत तिचा उपवास संपवतो.
चित्रपट - हम दिल दे चुके सनम
गाणं - चॉंद छुपा बादल में
सलमान खान आणि ऐश्वर्या रायच्या हम दिल दे चुके सनम चित्रपटात सलमान आणि ऐश्वर्या चंद्राची वाट बघताना दिसून येत आहेत.
चित्रपट - कभी खुशी कभी गम
गाणं - बोले चूडिया, बोले कंगना
या गाण्यात काजोल, शाहरुख खानसाठी तर करीना कपूर ऋतिक रोशनसाठी करवा चौथचा उपवास करताना दिसून येते.
चित्रपट - आशिक आवारा
गाणं - ए काश मैं देखू मैं आज की रात
ममता कुलकर्णी आणि सैफ अली खानच्या या चित्रपटात ममता करवा चौथसाठी सैफची वाट बघत असते.
चित्रपट - जख्म
गाणं - तुम आए तो आया मुझे याद
'जख्म' सिनेमातील हे गाणं प्रचंड लोकप्रिय आहे. या सिनेमात करवा चौथच्या दिवशी पूजा भट्टचा नवरा घरी आल्याने ती हैरान झालेली दिसते.
महाकालेश्वर मंदिर परिसरातही शूटिंग होणार
अभिनेता अक्षय कुमारच्या ओ माय गॉड 2 या चित्रपटाचे चित्रीकरण गुरुवारी रामघाट आणि दत्त आखाडा घाट येथे झाले. एडीएम संतोष टागोर यांनी माहिती दिली की चित्रपटाच्या युनिटला उज्जैन शहरातील विविध ठिकाणी 21 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान चित्रपटाच्या चित्रीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण महाकालेश्वर मंदिर परिसरातही होणार आहे. यामुळे भाविकांच्या दर्शन व्यवस्थेवर परिणाम होणार नाही. पूर्वीप्रमाणेच, त्यांना त्यांच्या आराधनेचे दर्शन घेता येईल.
‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटाला नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार
लवाले दुल्हनिया ले जाएंगे या सिनेमाने फक्त आदित्य चोप्राला सिनेमासृष्टीत ओळख मिळवून दिली असं नाही तर त्यावेळच्या आणि आताच्याही तरुणाईच्या प्रेमाला अभिव्यक्ती दिली. त्यामुळेच हा सिनेमा आजही आवडीने पाहिला जातो. आदित्य चोप्राने त्याची ही क्लासिक गणली केलेली कलाकृती आता ब्रॉडवे वर सादर करण्याचा निर्णय घेतलाय. पुढील वर्षी तो ब्रॉडवेवर हा सिनेमा संगितीकेच्या स्वरुपात सादर होईल. आदित्य चोप्रा या प्रोजेक्टवर गेल्या तीन वर्षांपासून काम करत होते, असं यशराज फिल्मकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय.